Allocation of money in the Central pool Fund from the Finance Department of Pune University
Allocation of money in the Central pool Fund from the Finance Department of Pune University 
पुणे

धक्कादायक : विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या खात्यांत बेकायदा पैसे जमा; 60 लाखांचे वाटप

ब्रिजमोहन पाटील

पुणे: एकीकडे 'कोरोना'मुळे पैसे बचतीसाठी धडपड सुरू असताना दुसरीकडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वित्त विभागाने व्यवस्थापन परिषदेच्या आदेशाला केराची टोपली दाखवत 'सेंट्रल पुल' निधीतील तब्बल ६० लाख रूपयांचे वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अधिकारी, कर्मचार्यांच्या बँक खात्यात हजारो रुपये जमा झाल्याने त्यांची दिवाळीच साजरी झाली आहे. मात्र आता हे वाटप वादाच्या भोवर्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

लॉकडाउनमुळे सामान्यांचे किचन बजेट कोलमडणार; भाज्यांसह फळांच्या दरात...

पुणे विद्यापीठात दैनंदिन कामकाजाला देखील 
विविध प्रकारचे मानधन, भत्ते देऊन मोठ्या प्रमाणात लाभ मिळवला जात असल्याने दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे वाटप केले जात होते. यावर नियंत्रण आणण्यासाठी व्यवस्थापन परिषदेने  नेमलेल्या समितीने सप्टेंबर २०१८ च्या सभेत अहवाल सादर केला. त्याचा अंमलबजावणी १ एप्रिल २०१९ पासून सुरू झाली. त्यामध्ये सेंट्रल पूल, गोपनिय कामाचे भत्ते यासह इतर मानधन वाटपावर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बंधन घातले आहे. तरीही वित्त विभागाने या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.


आमदार महेश लांडगे म्हणाले, 'लॉकडाउन करा, पण...'

वित्त विभागा गेल्या दोन वर्षात प्रकल्पांसाठी, इतर संस्थांच्या प्रवेश परीक्षेची प्रक्रिया यासाठी सुमारे ६० लाख रुपयांचा निधी 'सेंट्रल पूल'मध्ये जमा झाला होता. हे पैसे काही दिवसांपूर्वी अधिकारी, कर्मचारी यांच्या बँक खात्यात जमा झाल्यानंतर या बेकायदेशीर प्रकाराबाबत विद्यापीठात कुजबूज सुरू झाली. 

'सेंट्रल पूल' म्हणजे काय? 
पुणे विद्यापीठातील विभागांना केंद्र सरकार, यूजीसी यांच्याकडून विविध संशोधन प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात निधी येतो. हा निधी संबंधित विभागात संशोधन, त्यासाठी आवश्यक ट खर्च, मनुष्यबळ, प्रवास यायासह इतर कामांवर खर्च केला जातो. या मध्ये वित्त विभागातील अधिकारी, कर्मचारीही सहकार्य करतात, त्यामुळे त्यांना ही मदत म्हणून यातील १५ टक्के रक्कम ही वित्त विभागाकडे जमा केली जाते. ही रक्कम वित्त विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी त्यांच्या मुळ पगाराच्या प्रमाणात वाटप करून घेतात. या रकमेला 'सेंट्रल पुल' असा शब्द प्रयोग केला जातो. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

प्रकार लक्षात येताच पुन्हा पैसे जमा करण्याचे आदेश

'सेंट्रल पूल'चे तब्बल ६० लाख रूपये बेकायदेशीरपणे वाटप  कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हा प्रकार निदर्शनास आले. त्यांनी वित्त विभागाचे वित्त व लेखा अधिकारी अतुल पाटणकर यांना हे पैसे परत विद्यापीठाच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. यासंदर्भात  कुलगुरू करमळकर यांच्याशी वारंवार फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण प्रतिसाद मिळाला नाही. 

"सेंट्रल पूल'चा निधी वाटप करण्यात आला आहे. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी हे पैसे वसुल करण्याचे आदेश दिले आहेत, त्यानुसार त्याची प्रक्रिया सुरू आहे."
सीए अतुल पाटणकर, 
- वित्त व लेखा, अधिकारी  पुणे विद्यापीठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, काँग्रेसची जिझिया कर लावण्याची इच्छा

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT