water supply
water supply 
पुणे

शहरात सोमवारपासून  दिवसाआड पाणीपुरवठा 

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : शहरातील नागरिकांना समसमान पद्धतीने पाणी मिळावे, यासाठी सोमवारपासून (ता. 25) दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्याचे वेळापत्रक महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता मकरंद निकम यांनी शुक्रवारी (ता. 22) जाहीर केले. 


शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण शंभर टक्के भरले आहे. मात्र, महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेची पाणी उचलल्याची संपलेली क्षमता, सतत वाढणारे शहर, वाढणारी लोकसंख्या, हिशोबबाह्य पाण्याचे प्रमाण आणि पाणी गळती व चोरीचे 40 टक्के प्रमाण यामुळे शहराच्या बहुतांश नागरिकांना कमी दाबाने, अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून आठवड्यातून एक दिवस पाणीकपात सुरू होती. तरीही पाणी वितरण व्यवस्था सुरळीत होत नसल्याने सर्व नागरिकांना समसमान पद्धतीने पाणीपुरवठा करण्यासाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दोन दिवसांपूर्वी घेतला. त्याची अंमलबजावणी सोमवारपासून केली जाणार आहे. त्याचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर केले. 

नागरिकांनो, टाक्‍या बांधा 
योग्य क्षमतेच्या जमिनीवरील पाण्याच्या साठवण टाक्‍या नाहीत, अशा नागरिकांनी त्वरित टाक्‍या बांधून घ्याव्यात. तसेच, उपलब्ध पाणी जपून वापरावे, टाक्‍या भरून वाहू देऊ नये, जुन्या टाक्‍या दुरुस्त करून त्यांतून होणारी गळती थांबवावी, तसेच, घरातील नळ, पाइप यांचीही दुरुस्ती करून घ्यावी. रस्त्यावर कुठे पाण्याची गळती व चोरी होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांच्या महापालिकेच्या सारथी हेल्पलाईनला कळवावे, असे आवाहन निकम यांनी केले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक-चावलाची भेदक गोलंदाजी, पण हेड- कमिन्सच्या फटकेबाजीमुळे हैदराबादचे मुंबईसमोर 174 धावांचे लक्ष्य

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT