Alternative power supply will be provided in Peths from today 
पुणे

पेठांमध्ये पर्यायी व्यवस्थेतून आजपासून वीजपुरवठा होणार

सकाळवृत्तसेवा

पुणे : महापारेषणच्या रास्तापेठ जीआयएस (गॅस इन्सुलेटड सबस्टेशन) 132 केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रामध्ये उद्या (शनिवारी) सकाळी आठपासून ते रविवारी (ता. 27) रात्री आठपर्यंत पूर्वनियोजित देखभाल दुरुस्तीचे विविध तांत्रिक कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे महावितरणच्या एकूण 6 उपकेंद्रांचा वीजपुरवठा 36 तास बंद राहणार असल्याने या उपकेंद्रांसह शहरातील मध्यवर्ती परिसरात पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा करण्यात येणार असल्याचे महावितरणने कळविले आहे.

महापारेषणच्या 132 केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद राहणार असल्याने महावितरणला सुमारे 60 ते 65 मेगावॉट विजेचे भारव्यवस्थापन करावे लागणार आहे. सध्या थंडीचे दिवस आहेत. तसेच शनिवारी व रविवारी सार्वजनिक सुटी असल्याने विजेची मागणी कमी राहणार आहे. तथापि विजेचे भारव्यवस्थापन शक्‍य न झाल्यास किंवा पर्यायी व्यवस्थेमधील वीजवाहिनीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास शहराच्या मध्यवर्ती परिसरात चक्राकार पद्धतीने दीड ते दोन तासांचे भारनियमन करावे लागण्याची शक्‍यता आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

महावितरणच्या रास्तापेठ, पद्मावती व पर्वती विभाग अंतर्गत कसबा पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, रविवार पेठ, बुधवार पेठ, रास्तापेठ, भवानी पेठ, नाना पेठ, जुना मोदी खाना, कॅम्पचा काही परिसर, गुलटेकडी, गंजपेठ, सॅलिसबरी पार्क, घोरपडे पेठ, डायस प्लॉट, लोहियानगर, महर्षीनगर, मुकुंदनगर या परिसरामध्ये महावितरणच्या इतर उपकेंद्रांद्वारे पर्यायी स्वरूपात वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी महावितरणची यंत्रणा सज्ज आहे. मात्र, भारव्यवस्थापन शक्‍य न झाल्यास किंवा पर्यायी व्यवस्थेमधील वीजपुरवठ्यात तांत्रिक अडचण उद्भवल्यास चक्राकार पद्धतीने भारनियमन करावे लागण्याची शक्‍यता आहे. या कालावधीत वीजग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण व महापारेषणकडून करण्यात आले आहे.

पुणे-सोलापूर हाय-वेवर धावत्या ट्रॅव्हल्स घेतला पेट; जिवीतहानी नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT