corona1 
पुणे

आंबेगावकरांची झोप उडणार, आणखी दहा कोरोनाबाधित  

चंद्रकांत घोडेकर

घोडेगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्यात आज 10 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाबाधितांचा आकडा 83 वर गेला. तर, उपचार घेत असलेले रुग्ण 32 आहेत. आंबेगावची संख्या स्थिर राहिल, असे वाटत असतानाच आज एकदम 10 रुग्ण मिळाल्याने चिंतेत भर पडली आहे.

मंचर येथील तीन रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात 26 व 27 वर्षीय पुरुष व 34 वर्षीय महिला आहेत. मंचरमध्ये आता 14 रुग्ण झाले आहेत. मंचर शहरात वेगाने रुग्णसंख्या वाढत असल्याने मंचरकरांची झोप उडाली आहे. कोलदरे येथील एक महिला 3 दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह झाली होती. तिच्याच घरातील तीन पुरुषांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. येथे मुंबई कनेक्शनमुळे बाप व दोन मुले कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. या गावात चार रुग्ण झाले आहेत. घोडेगाव येथील 40 वर्षीय एक पुरुष कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे. घोडेगावातील हा तिसरा रुग्ण आहे. त्याचा फ्रुटचा व्यवसाय असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. महाळुंगे पडवळ येथे 70 वर्षाची महिला व 59 वर्षाचा पुरूष पॉझिटिव्ह झाले आहेत.

लांडेवाडी येथील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या सुरक्षारक्षकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने चिंतेत वाढ झाली आहे. लांडेवाडीत पूर्णपणे नाकाबंदी केली असून, आवश्यक ती उपाययोजना ग्रामपंचायतीने सुरू केली आहे. येथे पहिल्यादांच रुग्ण आढळला असून, ते खेड येथून ये-जा करत होते. दरम्यान आढळराव यांचा या सुरक्षा रक्षकाशी कमी प्रमाणात संपर्क झाला असल्यामुळे चिंता करण्याचे कारण नसल्याचे सांगण्यात येत आहे. 

आंबेगाव तालुक्यात रूग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनही चिंतेत पडले आहे. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकले म्हणाले की, तालुक्यात एकूण रुग्णसंख्या 83 झाली आहे. त्यात 32 उपचार घेत असून, 48 रूग्ण बरे होऊन घरी नेले आहेत. तर, 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आवश्यक असेल तरच बाहेर पडा. प्रशासनाला सहकार्य करा.

Edited by : Nilesh Shende   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagarpalika Election Date: या तारखेला नगरपालिकेची झुंज! स्थानिक स्वराज्यच्या पहिल्या टप्प्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, Time table बघा अन् लागा तयारीला...

Pune Bajirao Road Murder: पुण्यात कायद्याचा धाकच संपला? बाजीराव रोडवर दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने खून, रस्त्यावर रक्तपात

Latest Marathi News Live Update : शिरुर तालुक्यात बिबट्या जेरबंद; तीन बळींच्या घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक

Shukra Transit: २६ नोव्हेंबरपर्यंत तूळ राशीत राहणार शुक्र; मेष, वृषभसह 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव

Nashik Crime : कार्तिकी एकादशीला अवैधरीत्या दारू विक्री! महागड्या कारसह साडेसात लाखांचा मद्यसाठा जप्त, एकाला अटक

SCROLL FOR NEXT