ambil odha sakal
पुणे

आंबिल ओढा झोपडपट्टीवरील कारवाईची स्थगिती उठवली

दांडेकर पूल परिसरातील आंबिल ओढ्यालगतच्या झोपडपट्टीवरील कारवाईची स्थगिती महापालिका न्यायालयाने शुक्रवारी उठवली

सकाळ वृत्तसेवा

पुणे : दांडेकर पूल परिसरातील आंबिल ओढ्यालगतच्या झोपडपट्टीवरील कारवाईची स्थगिती महापालिका न्यायालयाने शुक्रवारी उठवली. त्यामुळे महापालिकेला पुढील कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दांडेकर पूल येथील सर्वे क्रमांक १३३, १३५ येथे नाला सरळीकरण केले जाणार आहे. तेथील महापालिकेच्या अडीच एकर जागेवर झोपडपट्टी असून, या ठिकाणी खासगी विकसकामार्फत एसआरए योजना राबविण्यात येणार आहे.

महापालिकेने जाहीर प्रकटन देऊन येथील झोपडपट्टीधारकांना संबंधित विकसकाशी संपर्क साधून स्थलांतर करावे, असे आवाहन केले होते. त्यानंतर महापालिकेने दोन महिन्यांपूर्वी दांडेकर पूल येथे अतिक्रमण कारवाई करून झोपड्या हटविण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी प्रचंड गोंधळ होऊन, महापालिकेच्या विरोधात नागरिकांनी आंदोलन केले होते.

ही कारवाई बेकायदेशीर असल्याचे सांगत न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावेळी महापालिका न्यायालयाने या कारवाईवर स्थगिती दिली होती. महापालिका न्यायालयात या याचिकेवर सुनावणी झाली, त्यावेळी महापालिकेच्या वकिलांनी ही कारवाई योग्य असून, येथील झोपडपट्टीधारकांचे स्थलांतर करण्यापूर्वी त्यांना दुसरीकडे घरे देण्यात आली आहे. यासंदर्भात कागदपत्र देखील सादर केली.

त्यानुसार न्यायालयाने झोपडपट्टीवरील कारवाईची स्थगिती उठवली असल्याने पुढील कार्यवाही करता येणार असल्याचे महापालिकेच्या विधी सल्लागार अ‍ॅड. निशा चव्हाण यांनी सांगितले. आंबिल कृती समितीचे अनंत घरत म्हणाले, ‘‘हा विषय टीपी स्कीमचा आहे. त्यामुळे वरिष्ठ न्यायालयात याचिका करण्यास सांगितल्याने स्थगिती उठवली आहे. आम्ही दिवाणी न्यायालय तसेच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे.’’

झोपडपट्टीधारकांच्यावतीने महापालिका न्यायालयात याचिका दाखल केली होती. आमची बाजू भक्कम होती, पण कारवाईवरील स्थगिती उठवली आहे. याविरोधात सत्र न्यायालयात दाद मागणार आहोत. -हनुमंत फडके, याचिकाकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Building Collapse: मुसळधार पावसात मुंबईमध्ये भीषण दुर्घटना! इमारत कोसळून ६ जणांचा मृत्यू; अनेक जण दबले, बचावकार्य सुरू

Women's T20 World Cup वर ऑस्ट्रेलियाचेच वर्चस्व! इंग्लंडला फायनलमध्ये पराभूत करत तब्बल सातव्यांचा 'चॅम्पियन'

Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलिया ७ व्यांदा विजेते! आजवर कधी अन् कोणत्या देशाने जिंकली ट्रॉफी? जगज्जेत्या कर्णधारांचीही पाहा यादी

Lonavala Schools Shut: लोणावळ्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट; नगरपरिषदेच्या हद्दीतील सर्व शाळांना ६ जुलैला सुट्टी

Lonavala Heavy Rain: लोणावळ्यात ३६ तासांत ४४० मिमी पाऊस; कार्ला फाटा-एकवीरा रस्ता व सोसायट्या पाण्याखाली, नागरिकांचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT