पुणे

शिक्रापूरकरांच्या सेवेसाठी कोवीड अ‍ॅंब्यूलन्स दाखल

सकाळवृत्तसेवा

शिक्रापूर : शिक्रापूरकरांच्या वैद्यकीय सेवेसाठी ग्रामपंचायतीचे वतीने पहिली स्वनिधीतील अ‍ॅंब्यूलन्स आज शिक्रापूरकरांच्या सेवेसाठी दाखल झाली. माजी उपसरपंच सागर सायकर यांच्या हस्ते अ‍ॅंब्यूलन्स लोकार्पण आज करण्यात झाले.

कोवीड काळात स्थानिक पातळीवर रुग्ण वाहतूक करण्यासाठी अ‍ॅंब्यूलन्स घ्यावी म्हणून शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता राऊत यांच्या अध्यक्षतेखालील ग्रामपंचायत बैठकीत निर्णय घेवून तसा निर्णय जिल्हा परिषदेला कळविण्यात आला होता. त्यानुसार १४ लाख २२ हजार रुपयांचा १४व्या वित्त आयोगाचा निधी काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेला वर्ग करुन सदर अ‍ॅंब्यूलन्स नुकतीच ग्रामपंचायतीकडे वर्ग करुन ती ग्रामपंचायतीकडे हस्तांतरीत करण्यात आल्याची माहिती सरपंच हेमलता राऊत यांनी दिली.

त्यानुसार सदर अ‍ॅंब्यूलन्सचे हस्तांतरण आणि लोकार्पण आज (ता. १) सकाळीच माजी उपसरपंच सागर सायकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सरपंच रामभाऊ सासवडे, नवनाथ सासवडे, दत्ता राऊत आनंदराव हजारे, दत्ता गिलबीले, दिलीप कोठावळे, राजेंद्र करंजे, विजय लोखंडे आदी उपस्थित होते.

दरम्यान, अ‍ॅंब्यूलन्ससाठी शिक्रापूर ग्रामपंचायतीकडून १४ लाख २२ हजार रुपये जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी व्ही. व्ही. गोरे यांनी दिली व त्यानुसार अ‍ॅंब्यूलन्स शिक्रापूरकरांच्या सेवेत दाखल होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT