Ambulance Sakal
पुणे

रुग्णवाहिकांचे नवे दर निश्चित; आरटीओने काढले आदेश

रुग्णवाहिकांचे दर नुकतेच निश्चित केले आहेत. त्या दरांची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी रुग्णालयांनी हे दरपत्रक ४ बाय ६ आकारात फ्लेक्स स्वरूपात दर्शनी भागात लावावेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - रुग्णवाहिकांचे (Ambulance) सुधारित दर (Rate) शहरातील सर्व शासकीय (Government) आणि खासगी रुग्णालयांनी (Private Hospital) फ्लेक्सच्या (Flex) स्वरूपात रुग्णालयाच्या आवारात नागरिकांना (People) दिसतील अशा पद्धतीने लावावेत, असा आदेश प्रादेशिक परिवहन कार्यालयाने बुधवारी दिला. (Ambulance New Rate Declare by RTO Order)

प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीओ) रुग्णवाहिकांचे दर नुकतेच निश्चित केले आहेत. त्या दरांची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी रुग्णालयांनी हे दरपत्रक ४ बाय ६ आकारात फ्लेक्स स्वरूपात दर्शनी भागात लावावेत, असे आदेशात म्हटले आहे. तसेच जादा दराने आकारणी झाल्यास नागरिकांनी rto.12-mh@gov.in किंवा homebranchpune@gmail.com वर संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी केले आहे.

रुग्णवाहिकांना पहिल्या दोन तासांसाठी अथवा २५ किलोमीटर अंतरासाठी रुग्णवाहिकेच्या प्रकारानुसार ६०० ते ९५० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी अनुक्रमे १२, १३ किंवा १४ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. तसेच प्रतीक्षा शुल्क प्रतितास १००, १२५ आणि १५० रुपये केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray On Sachin Ahir : सचिन अहिर शिंदे सेनेत जाताच आदित्य ठाकरेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, 'काय कमी केलं'

Wagholi News : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसूती दरम्यान बाळाचा मृत्यू; केसनंद येथील घटना, पतीची पोलिसांकडे लेखी तक्रार

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांचं निलंबन करण्याच्या मागणीसाठी आ.संजय गायकवाड पुत्रांचा एल्गार

Mumbai: मुंबईच्या पाणीपुरवठ्याला बॅकअप! भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात ट्रान्सफॉर्मर उभारण्याचा निर्णय; १४ कोटी ६७ लाख रुपयांचा खर्च

Delta Waterfall Goa : मित्रांसोबत धबधब्यावर जाणं बेतलं जीवावर! गोव्यात पर्यटनासाठी गेलेल्या 16 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी अंत; 'या' प्रसिद्ध धबधब्यावर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT