Ambulance Sakal
पुणे

पुण्यात अखेर रुग्णवाहिकांचे दर झाले निश्चित; काय आहेत दर वाचा

कोरोनाच्या काळात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची होणारी आर्थिक पिळवणूक दूर करण्यासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीए) रुग्‍णवाहिकांचे दर निश्चित केले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनाच्या (Corona) काळात रुग्ण (Patient) आणि त्यांच्या नातेवाईकांची होणारी आर्थिक पिळवणूक (Financial Extortion) दूर करण्यासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीए) (RTA) रुग्‍णवाहिकांचे दर (Ambulance Rate) निश्चित केले आहेत. खासगी रुग्णवाहिकांनाही हे दर लागू होणार असून त्यांची अंमलबजावणी मंगळवारपासून (ता. २५) होतील. (Ambulance rates finally fixed in Pune)

रुग्णवाहिकांसाठी अवाजवी पैसे आकारले जातात, अशा तक्रारी नागरिकांकडून प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे आल्या होत्या. त्याची दखल घेऊन ‘आरटीए’ने रुग्णवाहिकंचे दर निश्चित केले आहेत. प्रत्येक फेरीनंतर रुग्णवाहिकेचे निर्जंतुकीकरण करायचे, रुग्णवाहिकेला जीपीएस असेल, प्रत्येक रुग्णवाहिकेत दर तक्ता असेल, अशा अटी घालण्यात आल्या आहेत. तसेच सर्व रुग्णवाहिका वातानुकूल (एसी) असतील, असे गृहित धरून ‘आरटीए’ने दर निश्चित केले आहेत.

जिल्हा प्रशासनाने अधिग्रहीत केलेल्या खासगी रुग्णवाहिकांचे संचलन शासकीय रुग्णालय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत होईल. त्यांचा इंधन, देखभाल दुरुस्तीचा खर्च महापालिकेकडून करण्यात येईल. रुग्णवाहिका २४ तास किंवा त्याहून अधिक वेळ हवी असल्यास इंधन, देखभा- दुरुस्तीच्या आणि चालकाचे वेतन, सोडून २४ तासांचे दर निश्चित करण्यात आले आहेत. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि बारामती आरटीओच्या कार्यक्षेत्रात या दरांची अंमलबजावणी होईल, असे आरटीएचे सदस्य सचिव आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी स्पष्ट केले.

रुग्णवाहिकांचे सुधारित दर

रुग्णवाहिकेचा प्रकार ----२४ कि.मी. अथवा दोन तास------दर प्रती कि. मी. ------प्रती तास प्रतिक्षा शुल्क-----२४ तास किंवा अधिक वेळ

- मारुती ---------------------६०० रु. ----------------------१२ रु------------------१०० रु. --------------------८०० रु.

- टाटा सुमो, मॅटोडोर तत्सम-----७०० रु. --------------------१३ रु.------------------१२५ रु.-------------------१२०० रु.

- मोठ्या रुग्णवाहिका ----------९५० रु. --------------------१४ रु.------------------१५० रु. ------------------१६०० रु.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rani Mukherjee Mother Death: अभिनेत्री राणी मुखर्जीला मातृशोक! कृष्णा मुखर्जींचं निधन, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Asian Games 2026 Medal Table: भारतीय महिलांच्या 'Gold' ने पदकतालिकेत उलथापालथ, १२ व्या स्थानावर असलेलो आपण थेट पोहोचलो...

Supreme Court: एससी-एसटी कायद्यातील तरतुदींना आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली; नेमकं प्रकरण काय?

Numerology: लहान मुलांचा हट्टीपणा अन् जन्म तारीख; 'या' ३ मूलांकांची मुले असतात प्रचंड हट्टी! पाहा काय सांगते अंकशास्त्र...

Vishakha Raut: विशाखा राऊतांना दिलासा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; प्रिया सरवणकरांच्या नियुक्तीला ब्रेक

SCROLL FOR NEXT