junnar 
पुणे

वादळात अडकलेली रुग्णवाहिका...मग महसूलच्या कर्मचाऱ्यांनी...   

दत्ता म्हसकर

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील लेण्याद्री येथील कोविड सेंटरकडे कोरोनाचा संशयित रुग्ण घेऊन जाणारी रुग्णवाहिका चक्री वादळामुळे रस्त्यात पडलेली झाडे आणि विजेचा खांब व तारांमुळे अडकली होती. त्यावेळी महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत संबंधित खांब व तारा दूर करून रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून दिला. त्यांच्या या कामाचे सर्वांकडून कौतुक होत आहे. 

निसर्ग चक्रीवादळाने पुणे जिल्ह्यात थैमान घातले. याचा सर्वाधिक फटका पश्चिमेकडील गावांना बसला. जुन्नर तालुक्यातही या वादळामुळे मोठे नुकसान झाले. बुधवारी वादळाचा जोर जास्त होता. त्यावेळी सायंकाळच्या सुमारास जुन्नर तालुक्यातील कुरण एक रुग्ण संशयित रुग्ण लेण्याद्री येथील कोविड सेंटर येथे घेऊन एक रुग्णवाहिका निघाली होती. त्यामुळे या रुग्णवाहिकेला पुढे जाता येत नव्हते. त्यामुळे रुग्णवाहिकेचा चालकाने तहसील कार्यालयात फोनवरून कळविले. 

पुणे- नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचे अजित पवार यांच्यासमोर सादरीकरण
 
याबाबतची माहिती समजताच महसूल विभागाचे निवासी नायब तहसीलदार सचिन मुंढे, कर्मचारी प्रल्हाद पाटील, कोतवाल नवनाथ पानसरे यांनी तातडीने जेसबी पाठवून दिले. त्यानंतर तेही घटनास्थळाकडे पोचले. त्यावेळी जेसबी झाड दूर करण्याचे काम करत होता. मात्र, रुग्णाचा खोळंबा होऊ नये, यासाठी महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भर पावसात विजेचा खांब व तारा रस्त्यावरून बाजूला करत अडथळा दूर केला. त्यांनी केलेल्या या कामामुळे रुग्ण लेण्याद्री येथील कोविड सेंटरमध्ये पोचण्यास मोलाची मदत झाली. त्यांच्या या कामाचे कौतुक होत आहे.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adinath Maharaj: आदिनाथ महाराज नेमके कसे जखमी झाले? प्रत्यक्षदर्शी काय सांगतात? ९ वर्षांपूर्वी महाराज झाले होते बेपत्ता

Phaltan Politics: फलटणमध्ये सेटलमेंटचं राजकारण? भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचा सभापती; रामराजेंचा गटही धक्कादायकरित्या सत्तेत..

महागडे LPG विसरा! भारताने शोधला नवा स्वयंपाकाचा गॅस; ऊर्जा क्षेत्रात महत्त्वाचा प्रयोग, जाणून घ्या मोठी योजना...

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यावर मंत्र्यांचा यु-टर्न! संघटनांच्या संतापानंतर सरकारची माघार; थेट अटकेच्या मुद्द्यावर भूमिका बदलली

IPL 2026 मध्ये २-३ हजार धावा करायच्या आहेत! वैभव सूर्यवंशीचा आत्मविश्वास पाहून सारेच चक्रावले; म्हणाला, वैयक्तिक विक्रम...

SCROLL FOR NEXT