Amit Shah Team eSakal
पुणे

पुणे : सहा महिने आधीच शहांनी फोडला महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ

Amit Shah: अमित शहा यांनी महाविकास आघाडी सरकारला खुलं आव्हान दिलं.

सुधीर काकडे

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे सध्या महाराष्ट्र (Maharashtra) दौऱ्यावर आहेत. आगामी काळातील पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या (Pune Municipal Corporation Elections) पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी अमित शहा यांनी थेट पुणे महानगरपालिकेच्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी अमित शहांनी थेट महाविकास आघाडी सरकारवर (MVA Government) निशाणा साधला.

आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उडी घेत अमित शहा यांनी महाविकास आघाडी सरकारला खुलं आवाहन दिलं आहे. महाविकास आघाडी सरकारने डीबीटीची एक वेगळी व्याख्या बनवली असून, काँग्रेसने डीलर, शिवसेनेने ब्रोकर आणि राष्ट्रवादीने ट्रान्सफर करत भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला. यातूनच अनेकजण जेलमध्ये गेले असंही ते म्हणाले. 'आगामी काळात तिन्ही पक्षांशी आम्ही एकत्र लढू, महाराष्ट्राची जनता देखील तयार आहे असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीला थेट आव्हान दिलं आहे.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या पतनाची सुरुवात पुणे महापालिकेच्या निकालानं व्हायला हवी. लक्ष्य कधी कमी ठेऊ नका मित्रांनो. मी ऐकत होतो कोणी १०० तर कोणी १२० नगरसेवक असं म्हणतं होतं. पण जनता तुम्हाला जास्त नगरसेवक द्यायला बसली आहे, त्यामुळं मागण्यात कंजुषी करु नका. पुण्याची जनता फुलानं तुमचं स्वागत करायला तयार आहे. परिश्रम करा हे आपोआप होईल, अशा शब्दांत त्यांनी पुण्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि नगरसेवकांना प्रोत्साहित करत थेट पुण्याच्या राजकारणात उडी घेतली.

दरम्यान, भारतीय जनता पक्ष हा सर्व सामान्य कार्यकर्त्यांना संधी देणारी संधी आहे, मी सुद्धा एक बुथ प्रमुख म्हणून काम केलं होतं, त्यानंतर पक्षाने मला थेट अध्यक्ष होण्याची संधी दिली असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Koyna Dam Water Level कोयना ९२ टक्के भरले, ६ दरवाजे ३ फुटापर्यंत उघडणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Dombivli News: अल्पवयीन मुलीचा लोकलच्या धडकेत मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर; तरुणाला अटक, ३ महिन्यापूर्वी...

Marathi News Live Updates : हैद्राबादमधील पेट्रोल आणि डिझेल रिक्षांचे ईव्हीमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकाकडून १.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशमुळे कसोटी क्रिकेटमध्ये भूकंप! ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चीत, भारताचा फायदा; वाचा WTC Final Scenario

SCROLL FOR NEXT