Amitabh Kant statement about democracy is irresponsible 
पुणे

अमिताभ कांत यांचे लोकशाहीबद्दल विधान बेजबाबदार : सुप्रिया सुळे संतापल्या

सकाळवृत्तसेवा

पुणे : निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी मंगळवारी, ''भारतात लोकशाहीचे जास्तच कौतुक करतात त्यामुळे कडक आर्थिक सुधारणा लागू करणे अवघड जाते,'' असे मत मंगळवारी व्यक्त केले. कांत यांच्या विधानाचा निषेध व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी, 'जगातील सर्वात मोठ्या लोकशाही व्यवस्थेत हे अतिशय बेजबाबदार विधान आहे.'' अशा शब्दात ट्विट करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

कांत यांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे संतापल्या
''भारतात लोकशाहीचे कौतुक जास्त होतंय, हे वरीष्ठ पातळीवरील प्रशासकीय अधिकाऱ्याचे विधान धक्कादायक आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही व्यवस्थेत हे अतिशय बेजबाबदार विधान आहे. त्याचा तीव्र निषेध. भारतातील लोकशाही व्यवस्थेचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.'' अशा शब्दात संताप व्यक्त करत सुप्रिया सुळे कांत यांच्या विधानाचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काय म्हणाले अमिताभ कांत?

''भारतात लोकशाहीचे फारच कौतुक केले जाते. त्यामुळे आणखी कठोर आर्थिक सुधारणा करणे अवघड जाते.'' असे मत कांत यांनी प्रथमच ‘स्वराज्य’ नियतकालिकाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात व्यक्त केले. ''केंद्र सरकार सर्वच क्षेत्रांत कठोर सुधारणा करीत आहे. खाणकाम कोळसा, कामगार, कृषीसह जवळपास सर्व क्षेत्रांमध्ये सुधारणा केली जात आहेत, परंतु त्यांची अमंलबजावणी करणे कठीण जात आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

''देशाला स्पर्धात्मक करताना अजुन सुधारणा होणे गरजेच आहे. पण भारतात अतिलोकशाहीमुळे हे कठोर सुधाराणा लागू करणे खूप अवघड जात आहे. अशा सुधारणा करण्यासाठी राजकीय इच्छाशक्तींची नितांत गरज असते आणि ती सरकारने दाखवली आहे.'' असे मत व्यक्त करत त्यांनी सरकारची वाह वाह देखील यावेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT