Amol Kolhe Sakal
पुणे

Amol Kolhe : अमोल कोल्हेंबाबत वळसे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले...

यावेळी वळसे पाटलांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

सकाळ डिजिटल टीम

Dilip Walse Patil On Amol Kolhe : अमोल कोल्हेंबाबत राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटलांनी मोठं विधान केले आहे. यावेळी त्यांनी राज्य आणि केंद्रा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

हेही वाचा: ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भाजपला यश मिळणार नाही, असेही वळसे पाटील म्हणाले. पुण्यात आज शरद पवार यांच्या अध्यश्रतेखाली राष्ट्रवादीची बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची राजकीय भूमिका नेमकी काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून पक्षकार्यर्त्यांसोबत संवाद साधला जाणार आहे. तसेच प्रत्येक तालुक्याचा अंदाज घेऊन कार्यकर्त्यांना त्यासंबंधी आवश्यक सूचना शरद पवारांकडून कार्यकर्त्यांना दिल्या जाणार आहेत. त्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आली आहे.

भाजपवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, भाजपकडून उपस्थित केले जाणारे वादग्रस्त मुद्दे हे केवळ अनेक बाबतीतले अपयश झाकण्याचा आणि जनतेचं लक्ष झाकण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. मुंबईत अतिरिक्त सीपींची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यावर ते कसे काम करतात यावर आमचं लक्ष असेल.

वीज विभाजन माझ्या काळात झालं त्यावेळेस सांगितले होते की, आम्ही खाजगीकरण करणार नाही. पण अदानी आणि सरकारचं काय सुरू आहे माहिती नाही. युनियन समजदार आहेत, उपमुख्यमंत्र्यांनी महावितरणचं खाजगीकरण होणार नाही असा शब्द दिला आहे त्यामुळे आता दिलेल्या शब्दावर ते किती ठाम राहतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.

आगामी काळात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. ज्याप्रमाणे राज्यातील काही उद्योग गुजरातला वळवण्यात आले त्याप्रमाणे आता उर्वरित उद्योग उत्तर प्रदेशात वळवण्याचा योगींचा प्रयत्न आहे असा हल्लाबोल विरोधकांकडून केला जात आहे. मात्र, योगी आणि फडणवीस काहीही म्हटले तरी, उद्योगपतींना आपला उद्योग कुठे चालेल हे अचूक माहिती असतं.

अमोल कोल्हे नाराज नसल्याचे सांगत दोन्ही जागा राखण्यात राष्ट्रवादीला यश मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. २०२४ चा उमेदवार ठरवण्याचा अधिकार वरिष्ठ नेते घेतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT