AMOL KOLHE 
पुणे

अमोल कोल्हेंनी शब्द पाळला... बैलगाडा शर्यतीच्या घाटात घोडीवर मांड!

ओमकार वाबळे

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे त्यांच्या वक्तव्यांसाठी आणि अभिनयासाठी चर्चेत असतात. पण आज त्यांनी पुण्याच्या निमगाव दावडीत बैलगाडा घाटात घोड्यावर मांड ठोकली. २०१९ च्या निवडणुकीत कोल्हे यांनी भर सभेत निवडून आल्यानंतर घाटात बैलगाडा शर्यतीत घोडी पळवणार असल्याचं सांगितलं होतं. यावरून त्यांचे विरोधक आणि सेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी दिलेलं चॅलेंज पूर्ण केलं आहे. सध्या कोल्हेंच्या या घोडेस्वारीची चर्चा आहे. (Amol Kolhe Horse Riding)

आढळराव पाटील यांनी दिलेलं चॅलेंज पूर्ण केलं आहे. amol kolhe

घोडी धरेल की नाही अशी शंका होती, त्यांना उत्तर मिळालं आहे, असं म्हणत अमोल कोल्हेंनी आढळरावांना टोला लगावला. हात सोडून अक्खा घाट चालवलाय, असं कोल्हे म्हणाले. घाटात दोन्ही हात वर करून कोल्हेंनी सर्वांना अभिवादन केलं. त्यामुळे उपस्थित सर्वांनीच कोल्हेंच्या घोडेस्वारीवर टाळ्या वाजवल्या.

शब्द पूर्ण केला...सर्वांच्या साक्षीने पूर्ण केला..बारी मारली! असं ठसक्यात कोल्हेंनी सांगितलं. आणि शर्यतीसाठी उपस्थित सर्वांनीच जल्लोष केला.

पीटा (PETA) आणि इतर प्राणी मित्र संघटनांनी बैलगाडा शर्यतीदरम्यान बैलांना होणारी अमानुष मारहाण, बैलाना शॉक देण्यासारखे प्रकार, त्यांच्या शेपट्या चावल्या जाणं इ. कारणे देत बैलगाडा शर्यती विरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानुसार महाराष्ट्रात बैलगाडा आणि बैलांच्या शर्यतीवर न्यायालयाने बंदी घातली होती.

महाराष्ट्रात बंदी असताना तमिळनाडूतील ‘जल्लिकट्टू’ तसेच दक्षिण भारतातील इतर राज्यांतील बैल तसेच इतर प्राण्यांशी संबंधित खेळ सुरु आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरील बंदीही उठवावी, अशी मागणी बैलगाडा शर्यत प्रेमींकडून वारंवार होत होती. अखेर कोर्टाने मागणी मान्य करून तात्पुरता दिलासा दिला. त्यानंतर राज्यात पुन्हा शर्यती भरवण्यास सुरुवात झाली. पण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं कारण देत प्रशासनाने शर्यती बंद केल्या. यानंतर अखेर पुण्याच्या निमगाव दावडीत शर्यतींचं आयोजन झालं आणि कोल्हेंनी उपस्थिती लावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs CSK: सिक्स मारल्यानंतरही शिवम दुबेला कसं केलं आऊट? रवींद्र जडेजा म्हणाला, 'त्याला नेट्समध्ये गोलंदाजी केलीये, माहित होतं तो...'

RR vs CSK: वैभव सूर्यवंशीचा चेन्नईविरुद्ध झंझावात! विक्रमी अर्धशतक करत राजस्थानला मिळवून दिला 'रॉयल' विजय

लाडकी बहीण योजनेतून ७१ लाख महिला बाहेर, Ekyc साठी उरले फक्त २४ तास

IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

SCROLL FOR NEXT