Pune Crime News esakal
पुणे

Pune Crime News: जेवायला जातो सांगून गेला तो कायमचाच; मित्र वाट बघत राहिले पण त्याचा झाला होता करूण अंत

तरुणाचा मृतदेह आढळून आला आल्याने खळबळ उडाली

सकाळ डिजिटल टीम

अमरावतीतील एका तरुणाची पुण्यात निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या तरुणाचा गळा चिरून त्याची हत्या करण्यात आली आहे. हा धक्कादायक प्रकार शुक्रवारी मध्यरात्री घडला आहे. याची माहिती पोलिसांना (काल) शनिवारी सकाळी मिळाली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गौरव सुरेश उरावी (वय ३५, रा. खराडी, मूळगाव अमरावती) असं मृत तरुणाचे नाव आहे. तो मूळचा अमरावतीचा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात गळा चिरलेला मृतदेह आढळून आला. सोबत दुचाकी देखील होती. घटनास्थळाचा पंचनामा करून लोणीकंद पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला असून घटनास्थळी न्याय वैद्यकीय पथक तसेच श्वानपथक यांना पाचारण करण्यात आलं होतं.

गौरव उरावी हा खराडी येथील आयटी कंपनीमध्ये नोकरी करत होता. तसेच, तो खराडी येथे मित्रांसोबत पीजीमध्ये राहत होता. शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास जेवायला जातो, म्हणून मित्रांना सांगून गौरव निघाला. मात्र, रात्री पुन्हा तो आला नाही. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास गौरवचा गळा चिरलेला मृतदेह सापडला. हा खून नेमका कोणत्या कारणासाठी झाला हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत. गौरवचा अत्यंत अमानुषपणे गळा चिरून निर्घुणपणे खून का करण्यात आला याचा तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT