सेनापती बापट रस्ता - ‘ग्रॅव्हिटस रत्न’ या कॉफीटेबल बुकच्या प्रकाशन सोहळ्यात मुलाखतप्रसंगी (डावीकडून) सोनाली कुलकर्णी, अमृता फडणवीस, गौरी खान, उषा काकडे.
सेनापती बापट रस्ता - ‘ग्रॅव्हिटस रत्न’ या कॉफीटेबल बुकच्या प्रकाशन सोहळ्यात मुलाखतप्रसंगी (डावीकडून) सोनाली कुलकर्णी, अमृता फडणवीस, गौरी खान, उषा काकडे. 
पुणे

सामान्य जीवन जगायला आवडते - अमृता फडणवीस

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असले तरीही मला सामान्य जीवन जगायला आवडते. त्यांचे व्यक्तिमत्त्व मला मनापासून आवडते. मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तींविषयी अनेक प्रकारची मते व्यक्त केली जातात. मी त्यातील केवळ सकारात्मकता घेते,’’ असे मत मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले. 

कर्तृत्ववान महिलांच्या यशोगाथा असणाऱ्या ‘ग्रॅव्हिटस रत्न’ या कॉफीटेबल बुकच्या प्रकाशनप्रसंगी फडणवीस बोलत होत्या. ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्यावतीने या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. खासदार संजय काकडे, आमदार माधुरी मिसाळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, अभिनेता शाहरूख खान यांच्या पत्नी गौरी खान, ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे, डॉ. परवेझ ग्रॅंट, क्रेडाई राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर, रेखा मगर आदी उपस्थित होते. 

मेघा शिंपी व पराग पोतदार यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. या वेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी फडणवीस आणि खान यांची मुलाखत घेतली. खान म्हणाल्या, ‘‘इंटिरिअर डिझायनिंगमध्ये आनंद मिळतो. शाहरूख हा माझ्या पाठीशी उभा राहणारा पती आणि उत्तम पिता आहे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: PM मोदी अन् फडणवीसांमुळे डेव्हिड हेडलीचे स्टेटमेंट घेऊ शकलो, उज्ज्वल निकमांचा खुलासा

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Fact Check: धर्मांतर करा असे सांगणारा कन्हैय्या कुमार यांचा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल; वाचा काय आहे सत्य

Amitabh Bachchan: बिग बींचं एक ट्वीट अन् नव्या वादाला सुरुवात; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्विटर वॉर, नेमकं प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update : मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात नऊ उमेदवारी अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT