amruta fadnavis in pune demand degnity and permission for prostitution as profession  
पुणे

देहविक्रीबाबत अमृता फडणवीसांचं पुण्यात मोठं विधान, म्हणाल्या...

सकाळ डिजिटल टीम

पुणे : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देहविक्री व्यावसायाबद्दल आज पुण्यात एक मोठे विधान केले. त्यांनी यांनी भारतात देखील देहविक्री व्यवसायाला प्रोफेशन म्हणून मान्यता देण्याची मागणी करत इतर व्यवसायांप्रमाणे देहविक्री या व्यवसायाला देखील प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, असे म्हटले आहे.

अमृता फडणवीस या आज पुण्यातील बुधवार पेठेत झालेल्या एका कार्यक्रमात बोलत होत्या. पुण्याच्या बुधवार पेठेत महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर व मुलींसाठी सुकन्या कार्डचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आयजित कार्यक्रमास अमृता फडणवीस या उपस्थित होत्या.

तस्करी होत असेल तर तुम्ही त्याविरोधात उभ्या राहा आम्ही तुमच्या मागो आहोत, आपल्या मुलींना भविष्यात काय करायचे आहे हा त्यांचा निर्णय आहे, त्यांना एक सुरुवात देणं तुमची जबाबदारी आहे असे त्यांनी सांगितले. पुढे त्यांनी स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्या, कारण तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडे देखील लक्ष द्यायचं आहे. तुमची आरोग्य तपासणी करत राहा. तुम्ही ज्या व्यवसायात आहात त्यामध्ये आजार होण्याची शक्यता असते, ते ओळखून स्वत:कडे लक्ष द्या. नियमित तपासणी करत राहा असे त्यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या की, मी सरकारला हे म्हणेन जसे दुसरे व्यवसाय असतात तसे देहविक्री व्यवसायाला देखील सन्मान मिळाला पाहिजे, आणि प्रोफेशन म्हणून स्वीकारले गेले पाहिजे. जर्मनीसारख्या देशात तर देहविक्री या व्यवसायाला सन्मानाचे स्थान आहे, ते सरकारला टॅक्स देखील भरतात. ते स्थान आपण एकत्र आलो तर भारतात मिळू शकतं असे त्यांनी सांगितले.

अमृता फडणवीस यांनी जमलेल्या महिलांना सांगितेले की, आपल्या मुलींना शिकवा. आपल्या मुलांसाठी बचत करा. त्याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. वृद्धापकाळात वृद्धाश्रमाची गरज असते. त्यासाठी आपण पूर्णपणे प्रयत्न करू. मात्र, तुम्ही देखील आपल्या मुलांसाठी बचत करायला विसरू नका, तसेच बुधवार पेठेत चांगले प्रशिक्षक आणून योगाचे प्रशिक्षण देईन असे देखील त्यांनी यावेळी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Koyna Dam Water Level कोयना ९२ टक्के भरले, ६ दरवाजे ३ फुटापर्यंत उघडणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Dombivli News: अल्पवयीन मुलीचा लोकलच्या धडकेत मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर; तरुणाला अटक, ३ महिन्यापूर्वी...

Marathi News Live Updates : हैद्राबादमधील पेट्रोल आणि डिझेल रिक्षांचे ईव्हीमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकाकडून १.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशमुळे कसोटी क्रिकेटमध्ये भूकंप! ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चीत, भारताचा फायदा; वाचा WTC Final Scenario

SCROLL FOR NEXT