Vidya Sahakari Bank, 
पुणे

व्यापारी बॅंकांच्या तुलनेत सहकारी सक्षम - विद्याधर अनास्कर

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘‘देशभरातील नागरी सहकारी बॅंका व्यापारी बॅंकांच्या तुलनेत सर्वार्थाने सक्षम आहेत. त्यांच्याविषयी गैरसमज पसरविण्यापेक्षा रिझर्व्ह बॅंकेने त्यांना सक्षम करण्यासाठी मदत करायला हवी,’’ अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केली. 

विद्या सहकारी बॅंकेच्या ४७ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमात विद्या बॅंकेच्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. बॅंकेचे अध्यक्ष अरुण वीर, संचालक मंडळाचे सर्व सदस्य, कर्मचारी उपस्थित होते. नवीन बोधचिन्हात ‘व्ही’ या इंग्रजी अक्षरात सुरक्षित असलेला रुपया दर्शविला असून, या अक्षराच्या दोन्ही बाजू ठेवी व कर्जे यांचे द्योतक समजून बाणाच्या चिन्हाने प्रगतशील दर्शविल्या आहेत. यावेळी बॅंकिंग साक्षरता करणाऱ्या दिनदर्शिकेचे प्रकाशनही झाले. 

अनास्कर यांनी नागरी सहकारी बॅंकांचा पुण्यातील प्रवास या विषयावर दृकश्राव्य माध्यमातून सादरीकरण केले. अनास्कर म्हणाले, ‘‘सहकारी बॅंका याच खऱ्या तळागाळातील जनतेपर्यंत जोडल्या आहेत. देशात एक हजार ५४४ संस्था असून त्यांच्या अनुत्पादक कर्जाचे निव्वळ प्रमाण २.६९ टक्के आहे. जे व्यापारी बॅंकांपेक्षा कितीतरी कमी आहे. रिझर्व्ह बॅंकेने या सहकारी बॅंकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा.’’

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI World Cup Schedule : प्रतीक्षा संपली! वन डे वर्ल्ड कप २०२७ स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर; India vs Pakistan सामना कधी व केव्हा; जाणून घ्या टीम इंडियाचे टाईमटेबल

ICC ODI World Cup 2027 India Fixture: India vs Pakistan एकदा नव्हे, तर तीनवेळा भिडणार, जाणून घ्या कधी व कुठे खेळणार...

Crop Panchnama Maharashtra : दुष्काळी तालुक्यांत सुट्टीच्या दिवशीही पीक पंचनामे करा; ग्रामसेवक, तलाठ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, तीन दिवसाच्या सुट्ट्या रद्द

Dhananjay Munde : दुष्काळ प्रश्नी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले; पीएम किसान व नमो शेतकरी सन्मान चे दोन दोन हप्ते तातडीची मदत म्हणून वितरीत करण्याची मागणी

IND vs WI: प्रसिद्ध कृष्णानंतर वॉशिंग्टन सुंदरलाही मालिकेतून केलं OUT! चाहत्यांना धक्का, पण दुखापत नसताना का घेतला हा निर्णय?

SCROLL FOR NEXT