Anganwadi Staff indefinite strike from February 20 for various demand politics pune education
Anganwadi Staff indefinite strike from February 20 for various demand politics pune education esakal
पुणे

Anganwadi Staff Strike : राज्यातील अंगणवाडीसेविकांचा येत्या २० फेब्रुवारीपासून बेमुदत संप

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना थकीत सेवासमाप्ती लाभ द्यावेत, मासिक निवृत्तिवेतन सुरु करावे, या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांसाठी येत्या २० फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने घेतला आहे.

या कृती समितीच्या सदस्या शुभा शमीम, कमल परुळेकर, जयश्री पाटील, एम, ए. पाटील आदी सदस्यांनी या निर्णयाची मंगळवारी (ता.७) घोषणा केली. एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या जाणून घेऊन त्यावर मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या प्रतिनिधींसोबत आज बैठक आयोजित केली होती.

या बैठकीला कृती समितीचे एम. ए. पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, भगवान देशमुख, कलावती पोटकुले, संगीता कांबळे व राजेश सिंग आदी उपस्थित होते. या बैठकीत कृती समितीच्यावतीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना थकीत सेवासमाप्ती लाभ द्यावेत, निवृत्तिवेतन सुरु करावे, नवीन मोबाईल, पदोन्नती बाबतचे निकष निश्‍चित करावेत, आहार, इंधन, प्रवास व बैठक भत्ता मिळावा,

मोबाईल रिचार्जची थकीत देयके देण्यात यावीत, उन्हाळ्याच्या सुट्ट्या मिळाव्यात, वाढलेल्या लोकसंख्येसाठी नवीन अंगणवाडी सुरु करावी, मानधनामध्ये सेवेच्या अवधीनुसार ३१ व ६३ रुपये आणि ३,४,५ टक्के वाढ द्यावी, जादा पदभाराचा अतिरिक्त मेहनताना, साहित्य अंगणवाडीत पोहोच करणे, विविध विमा योजनांचा लाभ, इंधन व आहार दरात वाढ करावी, आदी मागण्यांवर चर्चा करण्यात आली. परंतु अंतिम निर्णय होऊ शकला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT