annis reply to discussion not in darbar but among selected experts pune esakal
पुणे

Pune News : दरबारात नाही तर निवडक तज्ज्ञांमध्ये चर्चेला या अंनिसचे प्रत्युत्तर

बागेश्‍वर बाबा यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीला दरबारात येऊन आमने समाने करण्याचे आव्हान दिले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बागेश्‍वर बाबा यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीला दरबारात येऊन आमने समाने करण्याचे आव्हान दिले आहे. पण बागेश्‍वर बाबा यांचे भक्त सोशल मिडियावर हिंसक प्रतिक्रिया देतात, स्वतः बाबांचे वक्तव्य हे चिथावणीखोर असतात. त्यामुळे अशा स्थितीत ‘दूध का दूध पानी का पानी’ करणे शक्य नाही.

बाबांनी दिलेले आव्हान ही पळवाट असून, त्यांनी निवडक लोकांमध्ये चर्चा करण्याची तयारी दाखवावी असे प्रत्युत्तर अंनिसचे पूर्णवेळ कार्यकर्ते विशाल विमल यांनी दिले आहे. बागेश्‍वर बाबांनी पत्रकार परिषदेत दिलेले आव्हान दिशाभूल करणारे आहे. बाबांच्या सत्संगाच्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था पाळण्याची जबाबदारी असणारी शासन यंत्रणा,

पोलिस यंत्रणा ही बाबांच्या वक्तव्याची आणि दाव्यांची सिद्धता चाचणी पार पाडू शकत नाहीत. त्यामुळे बाबांनी सोयीच्या ठिकाणी, वकील, पोलिस, निवडक कार्यकर्ते, विविध क्ष्रेत्रातील निवडक तज्ज्ञ मंडळींच्या समोर त्यांचे दावे सिद्ध करावेत आम्ही २१ लाखाचे बक्षीस देऊ असे आव्हान विशाल विमल यांनी दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 World Cup: RCB च्या नव्या शिलेदाराचं खणखणीत शतक, तर वैभव सूर्यवंशीची फिफ्टी; भारताला उभारला धावांचा डोंगर

Latest Marathi News Live Update : गायिका अंजली भारतीच्या वादग्रस्त वक्तव्याची राज्य महिला आयोगाने घेतली दखल

Horoscope : दोन दिवसात सुरू होतोय यश-लक्ष्मी योग! 'या' 5 राशींसाठी सुवर्णकाळ; मिळेल अनपेक्षित यश अन् भरपूर पैसा, जुनी समस्या सुटेल

'असली भांडणं कुठून शिकतेस?' शशांक केतकरने बायकोला विचारला प्रश्न, प्रियंकानं बिग बॉसचा शो दाखवत केलं असं काही की... viral video

Video: मिरा-भाईंदरमध्ये बांधला १०० कोटींचा 'विचित्र' पुल! ट्रोल झाल्यावर MMRDA चं स्पष्टीकरण; मनसेनं इंजिनिअर्सना दिला 'वस्तरा'

SCROLL FOR NEXT