Announcement of dates by Election Commission Elections for 92 municipalities in state will held on August 18 sakal
पुणे

राज्यातील 92 नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर; 18 ऑगस्टला मतदान

निवडणूक आयोगाकडून तारखांची घोषणा

मिलिंद संगई बारामती

बारामती : नगरपालिकांच्या निवडणुकांचा आज अखेर बिगुल वाजला. राज्यातील पर्जन्यमान कमी असलेल्या 17 जिल्ह्यातील 92 नगरपालिका व चार नगरपंचायतींच्या निवडणुकींचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आज जाहिर केला. 18 ऑगस्ट रोजी मतदान होणार असून या निवडणूकीची प्रक्रीया 20 जुलैपासून सुरु होणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार 20 जुलै रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहिर करणार असून लगेच 22 ते 28 जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरायची आहेत. छाननी व वैध नामनिर्देशन पत्र असलेल्या उमेदवारांची यादी 29 जुलै रोजी जाहिर केली जाणार असून 4 ऑगस्ट पर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत. उमेदवारी मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या दिवसानंतरच्या लगतच्या दिवशी अंतिम यादी प्रसिध्द केली जाणार आहे.

जेथे आवश्यकता भासेल त्या ठिकाणी 18 ऑगस्ट रोजी मतदान घेतले जाणार आहे. लगेच दुस-या दिवशी म्हणजे 19 ऑगस्ट रोजी मतमोजणी करुन निकाल जाहिर केले जाणार आहेत. यंदा अर्ज माघारी घेणे व प्रत्यक्ष मतदान यात 14 दिवसांचा कालावधी असून प्रचारासाठी दोन आठवड्यांचा कालावधी उमेदवारांना मिळणार आहे. यंदा प्रथमच संकेतस्थळावर उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबचा उल्लेख निवडणूक आयोगाने केलेला असल्याने ती एक नवीन बाब ठरणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अंतिम मतदार याद्यांची निश्चिती झालेली असून त्या मतदार याद्यानुसारच आता मतदान प्रक्रीया पार पडणार आहे. दरम्यान सत्ताबदलानंतर नगराध्यक्ष जनतेतून निवडावा अशी भाजपची भूमिका असल्याने राज्य शासन त्या बाबत काय निर्णय घेणार या बाबतही उत्सुकता आहे. मात्र आता निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम जाहिर केल्याने नगरपालिकांच्या निवडणकांचा बिगुल वाजला आहे.

या 92 नगरपालिकांच्या होणार निवडणूका

बारामती : राज्यातील कमी पर्जन्यमान असलेल्या 17 जिल्ह्यातील 92 नगरपालिका व चार नगरपंचायतींच्या निवडणूकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आज जाहिर केला. या कार्यक्रमानुसार 20 जुलैपासून निवडणूकीची प्रक्रिया सुरु होणार असून 18 ऑगस्ट रोजी मतदान व 19 ऑगस्टला मतमोजणी होणार आहे.

या मध्ये समाविष्ट नगरपालिका पुढील प्रमाणे

अ वर्ग नगरपालिका- भुसावळ, बारामती, बार्शी, जालना, बीड व उस्मानाबाद

ब वर्ग नगरपालिका- मनमाड, सिन्नर, येवला, दोंडाईचा वरवाडे, शिरपूर वरवाडे, शहादा, अंमळनेर, चाळीसगाव, कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, चाकण, दौंड, कराड, फलटण, इस्लामपूर, विटा, अक्कलकोट, पंढरपूर, अकलूज, जयसिंगपूर, कन्नड, पैठण, अंबेजोगाई, माजलगाव, परळी वैजनाथ, अहमदपूर, अंजनगाव सुर्जी,

क वर्ग नगरपालिका- चांदवड, नांदगाव, सटाणा, भगूर, वरणगाव, धरणागाव, एरंणडोल, फैजपूर, पारोळा, यावल, जामखेड, शेवगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, राहता, राहुरी, राजगुरुनगर, आळंदी, इंदापूर, जेजुरी, सासवड, शिरुर, म्हसवड, रहिमतपूर, वाई, आष्टा, तासगाव, पलूस, मोहोळ, दुधनी, करमाळा, कुर्डुवाडी, मैंदर्गी, मंगळवेढा, सांगोला, गडहिंग्लज, कागल, कुरुंदवाड, मुरगूड, वडगाव, गंगापूर, खुलताबाद, अंबड, भोकरदन, परतूर, गेवराई, किल्लेधारुर, भूम, कळंब, मुरुम, नळदुर्ग, उमरगा, परांडा, तुळजापूर, औसा, निलंगा, दर्यापूर, देउळगावराजा,

नगरपंचायती- नेवासा, मंचर, माळेगाव बुद्रुक, अनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT