Another accident at Navle bridge pune container truck hit the divider  
पुणे

Navale Bridge Accident: अरे चाललंय काय! नवले पुलावर आज पुन्हा अपघात; दुभाजकाला धडकला कंटेनर

विठ्ठल तांबे

पुणे : पुण्यातील नवले ब्रिजवर झालेल्या भीषण अपघाताची देशभरात चर्चा झाली. रविवारी या अपघातामध्ये एका कंटेनरने चक्क २४ वाहनांना धडक दिली. या भीषण अपघातात १३ जण गंभीर जखमी झाले. तर कार, रिक्षा, दुचाकी अशा वाहनांचा चक्काचूर झाला होता. यानंतर आज पुन्हा त्याच ठिकाणी अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

आज पुन्हा झालेल्या अपघातात भरधाव वेगात असणारा कंटेनर रस्त्याच्या मध्ये असणाऱ्या दुभाजकावर जाऊन धडकला. या धडकेत २ चार चाकी गाड्यांचे नुकसान झाले असून हा ट्रक कात्रजच्या दिशेने मुंबईकडे जात होता. रविवारी झालेल्या भीषण अपघातनंतर आज पुन्हा त्याच ठिकाणी हा अपघात झाला आहे.

हेही वाचा - गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

आज पुन्हा तीन अपघात

महामार्गावर नुकत्याच झालेल्या अपघाताच्या ठिकाणी पुन्हा कंटेनरने पुढे चाललेल्या कारला धडक दिली. माशांचे खाद्य घेऊन जाणाऱ्या या कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडला. दरम्यान या धडकेमुळे कंटेनर दुभाजक तोडून दुसऱ्या लेन मध्ये घुसला. यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. या कारमधील कुटुंब कोल्हापूरहून लोणवळा येथे जात होते.

दुपारी बारा वाजता एका कारने कट मारल्याने दोन दुचाकींचा अपघात झाला, या अपघातात रस्त्यावर पडल्याने इसम गंभीररित्या जखमी झाला. दरम्यान त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आज एकाच दिवशी या परिसरात तीन अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

Shirur Crime : पुणे–अहिल्यानगर महामार्गावर थरार; शिरूरजवळ तरुणावर कोयता-तलवारीने जीवघेणा हल्ला!

Shirur Extortion : “माझ्या एरियात काम करायचे असेल तर दोन लाख द्या”; शिरूरमध्ये कंत्राटदाराला धमकी देणारा तडीपार गुंड अटकेत!

IPL 2026 Auction live : Unsold खेळाडूसाठी काव्या मारनने मोजले १३ कोटी; सर्फराज खान CSKच्या संघात, पृथ्वी शॉ सर्वांना 'नकोसा'

Latest Marathi News Live Update : आयआयटी मुंबई मूड इंडिगो कार्यक्रमात विद्यार्थ्यांची तुफान गर्दी

SCROLL FOR NEXT