corona1 
पुणे

दौंडमधील या ग्रामस्थांची कोरोनाने वाढवली डोकेदुखी  

अमर परदेशी

वरवंड (पुणे) : दौंड तालुक्यातील पडवी येथे मागील आठवड्यात सापडलेल्या कोरोना रुग्णाच्या पत्नीला देखील कोरोना संसर्ग झाल्याचे गुरुवारी (ता. 9) मिळालेल्या वैद्यकीय अहवालात निष्पन्न झाले आहे, अशी माहिती वरवंड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवराणी पांचाळ यांनी दिली. दरम्यान, गावात आणखी एक रुग्ण सापडल्याने पडवीकरांची पुरती डोकेदुखी वाढली आहे.

दौंड तालुक्यात कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दौंडशहरासह वरवंड, पाटस, केडगाव, यवत या मोठ्या लोकसंख्येच्या गावामध्ये रुग्ण सापडत आहेत. आता जिरायती पट्ट्यातील गावांमध्येही देखील कोरोना संसर्ग वाढत चालला आहे. मागील आठवड्यात पडवी येथील एकास कोरोनाची बाधा झाली होती. संबधित व्यक्तीवर पुणे येथे उपचार सुरू आहे. या वेळी रुग्णाच्या घरातील व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले. दोन दिवसांपासून त्यांच्या पत्नीला त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना तपासणीला पाठविण्यात आले होते. आज प्राप्त झालेल्या अहवालात त्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांना उपचारासाठी तत्काळ पाठवून देण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कात आणखीन कोण आले का, याची माहिती घेण्यात येत आहे. गावात कोरोना रुग्णाची संख्या दोन झाल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान, वरवंडमध्ये देखील एकास कोरोना तपासणीसाठी पाठवून देण्यात आले आहे.  परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढत चालल्याने लोकांनी काळजी घ्यावी. कामाशिवाय कोणीही बाहेर पडू नये. तोंडाला मास्क लावावे. सतत हात धुवा. कोणाला काही त्रास जाणवल्यास तात्काळ आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन वरवंड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवराणी पांचाळ यांनी केले.

Edited by : Nilesh Shende

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB चा फलंदाज Unstoppable ! १४ चेंडूंत ६४ धावा कुटून संघाला मिळवून दिला दणदणीत विजय; KKR ला होतोय पश्चाताप

Latest Maharashtra News Updates : मराठा आरक्षणावरील जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर डबल बेड मॅट्रेस अन् सोफ्यासह दुरुस्तीचा खर्च तब्बल ४० लाख; इतकी उधळपट्टी कशाला? विरोधकांचा सवाल

Gemini Photo Trend : गुगल जेमिनीवर तुम्ही फोटो बनवताय, पण त्या फोटोचे पुढे काय होते? खरंच यामुळे डेटा लिक होतो का..जाणून घ्या सत्य

Maruti car price cut : दसरा, दिवाळीच्या आधी ‘मारूती’चा बडा धमका! कारच्या किंमतींमध्ये मोठी कपात जाहीर

SCROLL FOR NEXT