Raj Thackery  Esakal
पुणे

MNS Pune: पुणे शहर मनसेतील आणखी एका नेत्याची होणार हकालपट्टी; पदाधिकारी घेणार राज ठाकरेंची भेट

नेत्याच्या हाकलपट्टीसाठी पदाधिकारी घेणार राज ठाकरेंची भेट

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसात मनसेमध्ये होणारे अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी मनसेच्या माथाडी कामगार सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांची राज ठाकरे यांनी पदावरुन हकालपट्टी केली आहे. अशातच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वसंत मोरे यांनी राष्ट्रवादीत येण्याची थेट ऑफर दिली. या सर्व घटना सुरू असतानाच मनसेतील 400 कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले. अशातच आता आणखी एका बड्या नेत्याच्या हकालपट्टीची मागणी करण्यात येत आहे. यासंदर्भात पदाधिकारी राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. या सर्व घडामोडींमुळे मनसेतील अंतर्गत खदखद समोर येऊ लागली आहे.

माथाडी कामगार सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांच्या हकालपट्टीनंतर पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर बाबू वागस्कर हटाव पुण्यातील मनसे वाचवा असं कॅम्पिंग सुरू करण्यात आलं आहे. त्यामुळे पुणे मनसेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे पक्ष बांधणीसाठी प्रयत्न करत आहेत.दौरे करत आहेत. तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी माझा वाद नाही किंवा त्यांच्यावर माझी नाराजी नाही, असं माझिरे यांनी स्पष्ट केलं आहे. राज यांनी पुन्हा संधि दिली तर पुन्हा पक्षासाठी काम करेन माझा एकच विठ्ठल आहे आणि तो म्हणजे राज ठाकरे असंही माझिरे म्हणाले आहेत.

हे ही वाचा : Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

माझा वाद हा माझ्या विठ्ठलाच्या भोवती असणाऱ्या बडव्यांशी आहे. मी लवकरच 150 ते 200 कार्यकर्त्यांसह शिवतीर्थवर जाऊन साहेबांची भेट घेणार आहे. साहेबांनी संधी दिल्यास मी पक्षात पुन्हा काम करेन, अशी प्रतिक्रिया माझिरे यांनी दिली आहे. त्यामुळे पक्षातून बाहेर पडलेले माझिरे हे लवकरच स्वगृही परतणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

तर येत्या 2 दिवसामध्ये वसंत मोरे यांच्याबद्दल पक्ष येत्या दोन दिवसात भूमिका घेणार आहे. मनसेचे नेते बाबू वागस्कर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. पुणे शहरातील मनसे पक्ष कार्यालयात बैठक झाल्यानंतर पक्षाकडून ही माहिती देण्यात आली आहे. वसंत मोरे यांच्याबाबत आज चर्चा झाली नसली तरी सुद्धा, त्यांनी व्यक्त केलेल्या नाराजीवर पक्ष अधिकृतपणे येत्या दोन दिवसामध्ये भूमिका स्पष्ट करेल असं वागस्कर यांनी सांगितले आहे. पक्ष वसंत मोरे यांच्याबाबत काय भूमिका घेणार, त्यांच्यावर काही कारवाई करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT