grampanchayat
grampanchayat 
पुणे

ग्रामपंचायतीच्या प्रशासकपदासाठी आणखी एक आदेश, आता यांनाच मिळणार संधी  

भरत पचंगे

शिक्रापूर (पुणे) : राज्यातील २५ जुन रोजी मुदत संपलेल्या ग्रामपंचयातीवर प्रशासक नेमण्याच्या राज्यपालांच्या आदेशानंतर ग्रामविकास मंत्रालयाने आणखी एक आदेश काढला आहे. त्यानुसार ग्रामपंचायतींच्या प्रशासकपदासाठी नियुक्त करावयाच्या व्यक्तींसाठी त्या-त्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठीचे आरक्षण कायम ठेवण्यास सांगितले आहे. याबाबतचे लेखी आदेश ग्रामविकास मंत्रालयाकडून काढले आहेत. 

राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करताना अनुसुचित जाती व जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिलांपैकी ज्या प्रवर्गासाठी ज्या ग्रामपंचायतीत जे आरक्षण आहे, त्याच प्रवर्गातील आरक्षणानुसार प्रशासक नेमण्याचे अधिकार राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना दिल्याचे एक पत्र ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीम यांनी राज्यातील सर्व पालकमंत्र्यांना काल (ता. १५) काढले. या पत्राची प्रत सर्व जिल्हा परिषदांनाही देण्यात आली. त्यानुसार कालपासून जिल्हा परिषदेच्या प्रशासन विभागाकडून प्रशासकीय कार्यवाहीही सुरू करण्यात आली. 

याबाबत पुणे जिल्हा परिषदेकडूनही याबाबत दुजोरा देण्यात आला. याबाबत काल रात्री उशिरापर्यंत ग्रामविकास मंत्रालयाशी संवाद चालू असताना हाच आदेश कायम असल्याचे सांगण्यात आल्याने जिल्हा परिषद प्रशासन पुढील प्रशासकीय कार्यवाहीस लागल्याचे सांगण्यात आले. पर्यायाने योग्य व्यक्तीची निवड, महाविकासआघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या सत्ता असलेल्या ग्रामपंचायतींवर त्याच पक्षाचा प्रशासक नेमण्याच्या पक्षपातळीवरील आदेश, अशा एका मागून एका आदेशांचा धडाका सुरू आहे. 

दररोज नव्या निकषांमुळे प्रशासकपदाबाबतचा सस्पेन्स रंजक होत असताना कोणत्या ग्रामपंचायतीवर कुण्या पक्षाचा प्रशासक, याबाबत अजुन तरी तीनही पक्षांच्या तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय पदाधिका-यांचा सुसंवाद एकदमच छान आहे. प्रचंड प्रमाणात येत असलेले इच्छुकांचे अर्ज आणि त्यांच्या शिफारशींसाठी येणारे फोन यामुळे सर्व तालुकाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षही हैराण झाले असून, यादी फायनल करताना खरा कस लागणार आहे. 

प्रत्येक तालुक्यातील तीनही पक्षांचे तालुकाध्यक्ष एकमेकांच्या हल्ली चांगले संपर्कात आलेले असून, तीनही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांचाही दररोज संवाद-संपर्क असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख माउली कटके यांनी दिली. तसेच, प्रत्येक गावाचा ग्रामपंचायत कारभार उत्तम व्हावा असाच सक्षम प्रशासक नेमण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असून तीनही पक्षांच्या सर्व पदाधिका-यांचा उत्तम संवाद सुरू असल्याच्या माहितीला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनीही दुजोरा दिला.
 
Edited By : Nilesh J shende

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

IPL 2024 MI vs LGS : मुंबईचा ‘प्लेऑफ’चा मार्ग खडतर ; लखनौचा विजय,स्टॉयनिसची चमक

Bicycle Crunches: सायकल क्रंच करताना 'या' चुका करू नका, जाणून घ्या योग्य पद्धत

Mumbai News: दुर्गम भागातील नाही, भांडुपमधील प्रकार! डॉक्टरांनी केली टॉर्चच्या प्रकाशात प्रसूती, महिलेसह बाळाचा मृत्यू!

Latest Marathi News Live Update : दररोज काहीतरी बोलणाऱ्यांना मी उत्तर देणार नाही- देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT