corona
corona  
पुणे

जुन्नरला कोरोनाने ठोकला तळ, बाधितांचा आकडा पोचला...  

दत्ता म्हसकर

जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यातील उंब्रज नंबर एक येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५२ झाली असून, यापैकी ३२ जण बरे झाले असून, दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तरस १८ जण उपचार घेत आहेत.

अशी सुरू ठेवता येतील सलून आणि ब्यूटी पार्लर
 
डिंगोरे व औरंगपूर येथील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. उंब्रज येथील रुग्ण खामुंडीतील रुग्णाच्या संपर्कातील असल्याचे सांगण्यात आले. धनगरवाडी येथे लग्नासाठी आलेला पाव्हणा अनेकांच्या संपर्कात आला असल्याने गावची चिंता वाढली आहे. येथील १३ जणांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत. खामुंडी व मोकासबाग येथील रुग्णांचे संपर्कात आलेल्या २२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. खानापूर, धनगरवाडी, शिरोली खुर्द व उंब्रज नंबर एक येथील रुग्णाच्या संपर्कात आलेल्याचे अहवाल आले नाहीत.

जुन्नर तालुक्यातील गावनिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे : डिंगोरे- १ (बरा), सावरगाव- ५ (बरे), मांजरवाडी- २ (बरे), पारुंडे- ३  (बरे), आंबेगव्हाण- २ (बरे), धोलवड- ३ (बरे), धालेवाडीतर्फे मिन्हेर- १ (बरा), विठ्ठलवाडी वडज- १ (बरा), शिरोलीतर्फे आळे २ (बरे), खिलारवाडी- १ (बरा), कुरण- १ (बरा), 
चिंचोली- ३ (बरे), ओतूर- २ (बरा), जुन्नर- १ (बरा), राजुरी- १ (बरा), नवलेवाडी- १ (बरा), धामणखेल- १ (बरा), कुसूर- १. मृत्यू : औंरगपूर- १ (मृत्यू),  मोकासबाग- १ (मृत्यू), एक्टिव्ह : बोरी- ३, खामुंडी- ७, खानापूर- ३, शिरोली खुर्द- ३, उंब्रज नंबर एक- १. धनगरवाडी- १. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SEBI Decision: शेअर बाजारातील व्यवहाराचे तास वाढणार का? सेबीने नेमकं काय सांगितलं

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

IPL 2024 DC vs RR : राजधानी 'दिल्ली'साठी आर या पार...! प्लेऑफमध्ये टिकून राहण्यासाठी आज राजस्थानवर विजय आवश्यक

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

Latest Marathi News Live Update : अमित शहांनी बोरिवलीमध्ये भाड्याने घर घेतलंय- संजय राऊत

SCROLL FOR NEXT