CORONA 
पुणे

'ती' मुंबईहून पुण्यात आली आणि पुण्यातून शिक्रापूरात मग पुढे...

सकाळवृत्तसेवा

शिक्रापूर : मुंबईहून पुणे आणि पुण्यातून शिक्रापूरात आलेली एक गर्भवती (वय ३१) आज कोरोना बाधित असल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू संस्थेने दिला. दरम्यान सदर गर्भवतीच्या सोबतचे दोन कुटुंबीय आणि तिच्यावर उपचार करणारी नर्स व अ‍ॅंब्यूलन्सचालक या चौघांना आज तातडीन पुण्यातील औंध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, पुण्यातील साकोरेनगर-विमाननगर परिसरातून १० एप्रिल रोजी शिक्रापूरात आलेली ही गर्भवती महिला नेमकी कुठे कोरोनाबाधित झाली त्याचा शोध आम्ही घेत असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. डी. शिंदे यांनी दिली. २२ मार्च रोजी मुंबईहून पुण्यातील साकोरेनगर-विमाननगर परिसरात बाळंतपणासाठी आलेली सदर गर्भवती १० एप्रिल रोजी कोरोनाच्या भितीने शिक्रापूरातील एका बड्या गृहनिर्माण सोसायटीत आली होती. तिच्यात काही कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने तिच्या कुटुंबीयांनी सदर माहिती आरोग्य विभागाला दिल्यावरुन तिला पुण्यात औंध हॉस्पिटलमध्ये दाखल करुन तिचा घसा व नाकातील स्त्राव नमूना दोन दिवसांपूर्वी मुंबईतील राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविला होता. सदर कोरोना-पॉजिटिव्ह अहवाल आज प्राप्त झाला असून, तिच्यावर तातडीने उपचार सुरू केल्याची माहिती डॉ. शिंदे यांनी दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दरम्यान, तिचा पती व तिची आई या दोघांसह तिची शुश्रुषा करणारी नर्स तिची ने-आण करणारी अ‍ॅंब्यूलन्सचा चालक या चौघांनाही तातडीन औंध हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, या चौघांचेही घसा-नाकातील स्त्राव मुंबईला पाठविले आहेत. 

गेल्या दीड महिन्यात चार कोरोना-पॉझिटिव्ह सापडलेले व एक कोरोनामुळे मृत्यू पावलेला असे सगळे रुग्ण हे शिक्रापूरातील नियमित रहिवाशी नव्हते. पहिला तळेगाव-दाभाडे (ता. मावळ) येथून शिक्रापूरात आलेला, दूसरा डॉक्टर (रेडिओलॉजिस्ट) पुण्यातून प्रॅक्टीससाठी दररोज ये-जा करीत असलेला, तिसरा परभणीहून काही दिवसांपूर्वीच शिक्रापूरात कंपनीत कामासाठी आलेला आणि चौथी नुकतीच निष्पन्न झालेली रुग्ण मुंबई-पुण्यातून कोरोनाच्या भितीने शिक्रापूरात रहावयास आलेली अशी शिक्रापूरातील चारही कोरोना बाधित रुग्णांची हिस्ट्री आहे.

पर्यायाने मुळ शिक्रापूरकरांनी खुप दक्षता घेवूनही कोरोनाचा शिक्रापूरवर झालेला हल्ला हा केवळ बाहेरुन येणा-या मंडळींकडूनच झाल्याने पुणे-नगर महामार्ग वगळता शिक्रापूरात येण्या-जाण्यासाठीचे सर्व रस्ते गेल्या तीन दिवसांपासून पूर्ण बंद असून बाहेरुन येणा-या प्रत्येकावर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याची माहिती प्रभारी सरपंच भगवानराव वाबळे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

Pali News : मुंबई गोवा महामार्गाच्या खड्ड्यात चक्क मगरींचा मुक्काम! कामगारांची समयसूचकता अन मगरींना मिळालं नवजीवन

RCB vs SRH Live : पहिल्याच सामन्यात वाद... हेनरिच क्लासन अम्पायरच्या निर्णयावर नाराज... काव्या मारनही भडकली, सॉल्टच्या कॅचवर शंका?

SCROLL FOR NEXT