पुणे

Sextortion: पुण्यात सेक्सस्टॉर्शनचा आणखी एक बळी; दत्तवाडी परिसरातील 19 वर्षीय तरुणाची आत्महत्या

काही दिवसांपूर्वी धनकवडी येथील एका तरूणाने आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं

सकाळ डिजिटल टीम

धनकवडी पाठोपाठ पुण्याच्या दत्तवाडी परिसरातील एका 19 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शंतनु वाडकर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका मुलीकडून नग्न व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी येत होती. त्याने पैसे पाठवूनही सतत मेसेज येत असल्याने तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंतनु यांची इंस्टाग्राम वरुन प्रीत यादव नावाच्या व्यक्तीसोबत ओळख झाली होती. दोघेही एकमेकांसोबत चॅटिंग करायचे. दरम्यान प्रीत यादव नामक व्यक्तीने शंतानुला अर्धनग्न फोटो पाठवण्यास सांगितले होते.

या मागणीला बळी पडून त्याने हे फोटो पाठवले. त्यानंतर मात्र हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याच्याकडे पैसे मागण्यास सुरुवात झाली. शंतनूने 4500 हजार रुपये त्या व्यक्तीला दिले. मात्र फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पुन्हा पुन्हा पैसे मागितले जात होते. या त्रासाला कंटाळून शंतनूने 28 सप्टेंबर रोजी घराच्या इमारतीवरून खाली उडी मारून आत्महत्या केली.

काही दिवसांपूर्वी धनकवडी येथील एका तरूणाने आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. त्यालाही एका मुलीकडून नग्न व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी येत होती. त्याने पैसे पाठवूनही सतत मेसेज येत असल्याने तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT