apologized for Indian Bison death Flex in Pune 
पुणे

Indian Bison Death : ''आम्ही तुझे गुन्हेगार, फ्लेक्स लावून पुणेकरांनी मागितली माफी

सकाळवृत्तसेवा

कोथरूड (पुणे) : कोथरूडमधील महात्मा सोसायटीत शिरलेल्या रानगव्याचा काल मृत्यू झाला. वनविभागाने तब्बल 5 तास रेस्क्यू ऑपरेशन राबवून रानगव्याला ताब्यात घेतले होते.  पण, बिथरलेल्या गव्याला अति ताण येऊन त्याचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक शक्‍यता वन विभागाने वर्तविली आहे. लोकांच्या उत्साहाच्या भरात गवा सापडला संकटात अडकल्याची चर्चा सुरु आहे. अशातच पुण्यात पासोड्या विठ्ठोबा येथे '' आम्हाला माफ कर, आम्ही तुझे गुन्हेगार'' असा फेल्क्स पुण्यात लावले आहे. इतकेच नव्हे तर रानगव्याचा मोठा पुतळा उभा करुन श्रध्दाजंली वाहण्यात आली आहे. 


पुण्यातली नऊ डिसेंबर २०२० रोजीची सकाळ काहीशी वेगळीच उजाडली. कोथरूड, पौड फाटा भागात वन्यप्राणी आल्याची कुजबुज मॉर्निंग वॉकला गेलेल्या लोकांमध्ये सुरू होती.  काही वेळानं तो प्राणी म्हणजे रानगवा असल्याचे समजले आणि  खबर वणवा पसरावा, अशी अख्ख्या शहरात पसरली. ‘सोशल मीडिया’वरून या प्राण्याच्या फोटोसह त्याच्या आगमनाची वार्ता पुणेकरांपर्यंत पोचली. वन विभागाला कोणीतरी कळवलं. वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली. सगळीकडं उत्सुकता आणि भीती पसरली. गर्दीचे लोट घटनास्थळी पोचू लागले. गर्दी पाहून गोंधळलेला रानगवा सैरावैरा धावू लागला. मग, वन विभागही रानगव्याला जेरबंद करण्यासाठी सरसावला. रानगवा लोकांच्या, वाहनांच्या गर्दीतून वाट सापडेल तिकडं धावत सुटला. अखेर तो जेरबंद झाला. मात्र भेदरलेल्या, दमलेल्या, थकलेल्या रानगव्याचा संघर्ष थांबला आणि त्यानं शेवटचा श्‍वास घेतला.  

सिंहगडावर पहिल्याच दिवशी हजार पर्यटक 

या सर्व घटनेनंतर नागरिकांच्या अतिउत्साहामुळे रानगव्याने जीव गमावला. लोकांची एवढी गर्दी झाली नसती तर तो रानगवा घाबरला नसता. सैरवैरा धावला नसता. आणि कदाचित तो.... जे झालं ते आता बदलणे शक्य नसले तरी माणसाला त्याने केलेल्या चुकीची जाणीव असणे देखील महत्त्वाचे असते. ही चूक मान्य करण्यासाठी फ्लॅग फॉऊडेशने पुढाकार घेतला आहे. पुण्यात रानगव्याचा मोठा पुतळा उभा करुन श्रध्दाजंली वाहण्यात आली आहे आणि ''आम्हाला माफ कर, आम्ही तुझे गुन्हेगार'' असा फेल्क्स पुण्यात लावून माफी मागितली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

Nagpur Crime : अपघाताच्या विम्याच्या कागदपत्रासाठी मागितले आठ हजार; उपनिरीक्षक, हेडकॉन्स्टेबल एसीबीचा जाळ्यात

Shital Mahajan : स्पेनमध्ये स्कायडायव्हिंग करून शीतल महाजन यांच्या पंतप्रधानांना शुभेच्छा

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

Archana Kute: 'ज्ञानराधा मल्टिस्टेट'च्या अर्चना कुटेंना पुण्यातून अटक; छाप्यात काय-काय सापडलं?

SCROLL FOR NEXT