MKCL
MKCL Sakal
पुणे

मराठीच्या समृद्धीसाठी ॲप करणार भाषांतर

सकाळ वृत्तसेवा

पुणे - डिजिटल उपकरणांत सध्या मराठी भाषा वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आता मराठीतून इतर कोणत्याही भाषेत आणि अन्य कोणत्याही भाषेतून मराठीत भाषांतर करणे ‘आय.टी.त.मराठी’ या ॲपमुळे सोपे होणार आहे. मराठीच्या समृद्धीसाठी आणि विकासासाठी हे ॲप विकसित केले आहे.

मराठी भाषेतून ज्ञान, माहिती तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण मराठी भाषेतून व्हावी, तसेच इंटरनेटवर मराठीचा वापर वाढवून जगभरातील विविध क्षेत्रांतील ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत मराठी भाषेतून पोचविण्यासाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) प्रयत्न करत आहेत. त्याच एक भाग म्हणून हे ॲप तयार केले आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ‘एमकेसीएल’ने या ॲपची निर्मिती केली आहे.

हे ॲप सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांना, नागरिकांना दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरणार आहे. संगणक, स्मार्टफोन यावर मराठीचा वापर होण्यासाठी हे ॲप महत्त्वाचे ठरणार आहे. गुगल प्ले स्टोअर किंवा एमकेसीएलच्या संकेतस्थळावरून हे ॲप विनामूल्य डाऊनलोड करता येणार असल्याची माहिती एमकेसीएलतर्फे देण्यात आली आहे.

ॲपची वैशिष्ट्ये

  • गुगलचा वापर करून माहिती शोधणे व मराठी टायपिंग शिकणे

  • टंकलेखनापेक्षा मोबाईलवर मराठीत बोलून संदेश लिहिणे (व्हाइस टायपिंग)

  • मराठीतून इतर कोणत्याही भाषेत व अन्य कोणत्याही भाषेतून मराठीत भाषांतर करणे

  • मराठीतून वेगवेगळे ॲप आणि वेबसाईटचा वापर

  • सोशल मीडियावरही मराठी वापरणे शक्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT