Appeal of this Pune University administration Visit only if there is urgent work  
पुणे

पुणे विद्यापीठात या, पण अत्यावश्यक काम असेल तरच..

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने पुणे शहरात निर्बंध आणले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने लहान सहान कामासाठी विद्यापीठात येऊ नका, शक्य तेवढी कामे
ऑनलाईन आणि फोनवरून करून घ्या. अत्यावश्यक काम असेल तरच विद्यापीठात यावे अशा सूचना विद्यापीठ प्रशासाने दिल्या आहेत. पुणे विद्यापीठात शैक्षणिक व प्रशासकीय कामानिमित्त पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातून संस्थांचे प्रतिनिधी, प्राध्यापक, विद्यार्थी येत असतो. त्यामुळे कार्यालयात गर्दी होत आहे. शासकीय कार्यालयातील उपस्थिती ५० टक्क्यांवर आणलेली असली तरी विद्यापीठात वित्त, परीक्षा विभाग यासह अत्यावश्यक सेवा असलेल्या ठिकाणी १०० टक्के उपस्थिती आहे. त्यातच विद्यापीठाततील काही अधिकारी व कर्मचारीही करोनाबाधित आढळून आले आहेत. यामध्ये विद्यापीठात रहिवासी असलेल्या कर्मचाऱ्यांपेक्षा बाहेरून विद्यापीठात येणार्या कर्मचार्यांना कोरोना होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे समोर आले आहे. 

कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार म्हणाले, पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने विद्यापीठानेही खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांच्या व्यतिरिक्‍त बाहेरील व्यक्‍तींना विद्यापीठात प्रवेश दिला जाणार नाही. शैक्षणिक संस्थांनी त्यांची कामे ऑनलाईन व फोनवरून करून घ्यावीत. खूपच अत्यावश्यक काम असेल तरच संस्थेचा प्रतिनिधी पाठवावा.  तसेच विद्यापीठातील कार्यालयांमध्ये देखील नियमांचे पालन करून कामकाज व्हावे याकडे लक्ष आहे. सर्व प्रशासकीय व शैक्षणिक विभाग सॅनिटायझर पूर्ण झाले असून,  परीक्षा विभाग वगळता इतर विभागात सायंकाळी सहा नंतर  काम बंद होईल. 

इतके कनफ्युज मुख्यमंत्री बघितले नाहीत - मनसे

विद्यापीठात लसीकरण
विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या नातवाईकांसाठी शेठ तारांचद रामनाथ आयुर्वेदिक रुग्णालय ट्रस्टच्या सहयोगाने लसीकरण करण्यात येत आहे. त्यानुसार लसीकरणची प्रक्रिया सुरू आहे.

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी असा असेल मेगाब्लॉक

परीक्षेनंतर वाचनकक्ष बंद 
११ एप्रिल रोजी एमपीएससीची अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा होणार आहे. या परीक्षेचा विद्यार्थी अभ्यास करत असल्याने वाचनकक्ष सुरू आहे. ही परीक्षा संपताच वाचनकक्षही बंद केले जाणार आहे, असे डॉ. पवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा १५ वर्षानंतर तोच जलवा! झळकावले ५८ वे शतक; १७ चेंडूंत कुटल्या ७४ धावा, सचिनचा विक्रम संकटात

Health Alert : सतत पिझ्झा-बर्गर खाणं आलं अंगलट!16 वर्षीय मुलीचा मृत्यूचं धक्कादायक सत्य उघड

Vijay Hazare Trophy : रोहित शर्माच्या १५५ धावा... १८ चौकार अन् ९ षटकार; मुंबईचा दणदणीत विजय

Swiggy Instamart Report : 'या' पठ्ठ्याने वर्षात कंडोमवर खर्च केलेत चक्क १ लाख रुपये! महिन्याला १९ ऑर्डर्स; व्हॅलेंटाईन डेला तर...

Latest Marathi News Live Update :गजन गौडा पाटील आणि आशिष सुरडकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT