RTE Admission sakal
पुणे

RTE Admission : ‘आरटीई’ जागांची अर्जप्रक्रिया तात्पुरती बंद ;प्रवेशप्रक्रिया पूर्वीसारखीच होणार

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवर शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील प्रवेशासाठी सध्या सुरू असलेली प्रक्रिया शालेय शिक्षण विभागाने तात्पुरती बंद केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवर शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील प्रवेशासाठी सध्या सुरू असलेली प्रक्रिया शालेय शिक्षण विभागाने तात्पुरती बंद केली आहे. मुलांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होती. आता ही प्रवेशप्रक्रिया पूर्वीप्रमाणेच राबविण्यात येणार असून, पालकांना त्याची प्रतीक्षा लागली आहे.

राज्य सरकारने ९ फेब्रुवारी रोजी ‘आरटीई’नुसार प्रवेशप्रक्रियेत बदलांची अधिसूचना काढली. या अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली. आता न्यायालयाच्या आदेशानुसार शालेय शिक्षण विभागाने कार्यवाही सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अर्ज भरण्याच्या ऑनलाइन लिंक तात्पुरत्या बंद करण्यात आल्याचे ‘आरटीई’च्या संकेतस्थळावर नमूद केले आहे.

शालेय शिक्षण विभागातर्फे दरवर्षी या जागांसाठी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जाते. परंतु फेब्रुवारीच्या प्रारंभी सरकारने काढलेल्या अधिसूचनेनुसार यंदा खासगी शाळांसह सरकारी, अनुदानित शाळांचीही नोंदणी करून घेण्यात आली. त्यानुसार राज्यातील ७६ हजार ५३ शाळांमधील आठ लाख ८६ हजार ४११ राखीव जागांसाठी आतापर्यंत ६९ हजार ३६१ पालकांनी अर्ज केले आहेत.

दरवर्षी प्रवेश प्रक्रियेत तीन ते साडे तीन लाख अर्ज केले जातात. राज्य सरकारने सरकारी आणि अनुदानित शाळांनाही सामावून घेतल्याने यंदा अल्प प्रतिसाद लाभला होता. आता लवकरच या प्रक्रियेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांचा खासगी इंग्रजी शाळांमधील प्रवेशाचा मार्ग पुन्हा एकदा खुला होणार आहे. अधिसूचनेमुळे हजारो विद्यार्थ्यांचा खासगी शाळांमध्ये प्रवेशाचा मार्ग बंद होणार होता, त्यामुळे याविरुद्ध न्यायालयात दाद मागितली. या संदर्भातील जनहित याचिकेवरील नुकत्याच झालेल्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने अधिसूचनेला स्थगिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dream XI च्या गच्छतीनंतर BCCI ने आणली IPL Fantasy League, टीम निवडा, बक्षिसे जिंका, पण नियम काय?

Uttarakhand News : उत्तराखंडचा कायापालट! हरिद्वार-ऋषिकेशपर्यंत धावणार 'रॅपिड रेल'; मुख्यमंत्री धामींचा पंतप्रधान मोदींकडे कनेक्टिव्हिटी आणि संरक्षणाचा 'महाप्लॅन'

Latest Marathi News Live Update : पुण्यात दोन तरुणांवर धारधार शस्त्राने वार

'या' ४ मूलांकाचे लोक असतात सर्वांत जास्त रागीट; समोर शांत पण खुन्नस ठेऊन घेतात बदला, त्यांना नाराज कराल तर उलटे दिवस सुरू

Unseasonal Rain : शिराळ्यात अवकाळी पावसाचा तडाखा; वादळामुळे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT