पुणे

भारतीय नौदलात अधिकारीपदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

सकाळ वृत्तसेवा

पुणे : भारतीय नौदलाच्या वतीने शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एसएससी) अंतर्गत अधिकारी पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये विविध विभागांसाठी ५० पदांकरिता ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया केवळ पुरुष उमेदवारांसाठी ठेवली आहे. (application process starts for officer post in indian navy)

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा लेखी परिक्षा होणार नसून थेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या (एसएसबी) मुलाखती होणार आहेत. त्यासाठी पदवीतील गुणांच्या आधारावर उमेदवारांना एसएसबी प्रक्रियेसाठी निवडण्यात येणार आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून बीई किंवा बीटेक पदवी असलेल्या उमेदवारांना अर्ज भरता येईल. तसेच, उमेदवारांना पदवीत ६० टक्के गुण मिळवलेले असणे आवश्‍यक असून, वयोमर्यादा ही १८ ते २५ पर्यंत ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) ‘सी’ सर्टिफिकेट असलेल्या उमेदवारांना पदवीच्या गुणांमध्ये पाच टक्क्यांची सवलत देण्यात येणार आहे. एकूण ५० जागांसाठी असलेल्या या भरती प्रक्रियेत ४७ जागा जनरल सर्व्हिससाठी; तर तीन जागा हायड्रो केडर पदासाठी असणार आहे.

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी व यासंदर्भातील अधिक माहितीसाठी उमेदवारांना joinindiannavy.gov.in या नौदलाच्या अधिकृत वेबसाइटचा वापर करता येईल. तसेच, इच्छुक उमेदवारांना २६ जूनपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Exam Result : बारावीचा निकाल २.१२ टक्क्यांनी वाढला; कोकण विभागाचा सर्वाधिक ९७.५१

Narendra Modi : ... तर नेहरूंनी आरक्षणच दिले नसते

Pune News : विशाल अग्रवालसह चार जणांना अटक

Azamgarh Loksabha Election : ‘सप’च्या बालेकिल्ल्यात दोन यादवांमध्ये लढाई; धर्मेंद्र यादव विरुद्ध दिनेशलाल निरहुआ

Milind Deora : उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेस पक्ष सोडला

SCROLL FOR NEXT