RTE 
पुणे

आरटीई २५ टक्के राखीव जागांच्या प्रवेशासाठी येत्या ३ मार्चपासून अर्ज करता येणार

सकाळवृत्तसेवा

पुणे - खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवर विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांना येत्या बुधवारपासून (ता.३) ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिली आहे. आरटीईनुसार खासगी शाळांमध्ये प्रवेशस्तरावर २५ टक्के जागा आर्थिक दृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याची तरतुद आहे. या राखीव जागांवरील प्रवेशासाठी दरवर्षीप्रमाणे ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात येते. त्याचप्रमाणे यंदाही २०२१-२२ शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. शिक्षण विभागातर्फे २५ टक्के जागा उपलब्ध असणाऱ्या शाळांना नोंदणीसाठी वारंवार मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा या प्रवेश प्रक्रियेतंर्गत शाळा नोंदणीसाठी कमी प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावर्षी प्रवेश प्रक्रियेतंर्गत आतापर्यंत राज्यातील नऊ हजार ४३१ शाळांनी नोंदणी केली असून प्रवेशासाठी केवळ ९६ हजार ८०१ जागा उपलब्ध झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील ९८५ शाळांनी नोंदणी पूर्ण केली असून त्यातील १४ हजार ७४१ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. 

दरम्यान सर्व जिल्ह्यातील शाळांची ऑनलाइन नोंदणी पूर्ण होणे आवश्यक असल्याचे जगताप यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. या प्रवेश प्रक्रियेतंर्गत ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा येत्या बुधवारपासून उपलब्ध होणार आहे. पालकांना २१ मार्चपर्यंत हे ऑनलाइन अर्ज भरता येतील, असेही जगताप यांनी सांगितले आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

8 Feet Crocodile Spotted in Krishna River : औदुंबरच्या कृष्णा नदीच्या डोहात आढळली आठफुटी मगर; घाटावर दररोज उन्हात बसताना दिसल्याने भाविकांमध्ये खळबळ

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Sudden Underarm Pain: काखेत अचानक दुखायला लागलंय? साधी वेदना समजून दुर्लक्ष करू नका; 'या' कारणांमुळे होऊ शकतो त्रास

SCROLL FOR NEXT