Girls Police Sakal
पुणे

बारामतीच्या २५ मुलींची पोलिस शिपाई पदावर नियुक्ती

बारामती-शारदानगर येथे रणरागिणी घडविण्याचे कार्य़ करणाऱ्या शारदा पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातून यंदा २५ युवतींची पोलीस शिपाई पदावर नियुक्ती झाली.

कल्याण पाचांगणे

बारामती-शारदानगर येथे रणरागिणी घडविण्याचे कार्य़ करणाऱ्या शारदा पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातून यंदा २५ युवतींची पोलीस शिपाई पदावर नियुक्ती झाली.

माळेगाव - बारामती-शारदानगर येथे रणरागिणी घडविण्याचे कार्य़ करणाऱ्या शारदा पोलिस भरतीपूर्व (Police Recruitment) प्रशिक्षण केंद्रातून यंदा २५ युवतींची (Girls) पोलीस शिपाई (Police Peon) पदावर नियुक्ती (Selection) झाली. विशेषतः गेली १४ वर्षांपासून हे प्रशिक्षण केंद्र सामान्य मुलींसाठी मोफत कार्य़रत आहे. या केंद्रातील आजवर ६१३ मुली महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या पोलिस मुख्यालयात व पोलिस ठाण्यात कर्तव्य बजावत आहेत. ग्रामीण भागात मुलींनी पोलिसाची खाकी वर्दी अंगावर घालायची, ही कल्पनाच काही वर्षांपुर्वी लोकांना सहन होत नव्हती. परंतु बदलत्या काळानुसार लोकांची विचारसणी बदलविण्यात अॅग्रीकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, विश्वस्त सौ. सुनंदा पवार यशस्वी झाले. त्यामुळेच सहाशेपेक्षा अधिक मुलीं स्वतःच्या कणखरपणाच्या जोरावर पोलिस दलात काम करताना दिसतात. दरम्यान, महाराष्ट्र शासन पोलीस भरती 2019 अंतर्गत ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शारदा प्रशिक्षण केंद्रातून २५ युवतींची पोलीस शिपाई या पदावर नुकतीच नियुक्ती झाली.

या सावित्रींच्या लेखींचा सन्मान सुनंदा पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी सौ. पवार म्हणाल्या, `` ग्रामीण मुलींमध्ये असणारा कणखरपणा, शारदा प्रशिक्षण केंद्रातून दिलेले जाणारे आवश्यक ज्ञान आणि विशेषतः संबंधित मुलींच्या मनात ध्येय  साध्य करण्याची प्रचंड इच्छाशक्ती या कारणांमुळे युवती मोठ्या प्रमाणात पोलिस भरती होत आहेत. पोलिस खात्यामध्ये सुरक्षितता आहे व करिअर करण्याची संधी आहे. ही बाब आता लोकांना पटली आहे.

आर्थिक परिस्थितीमुळे बारावीनंतर शिक्षण सोडलेल्या व उच्च शिक्षण घेता न येणाऱ्या युवतींना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, या हेतूने शारदा प्रशिक्षण संस्था कार्यरत आहे.`` यावेळी संस्थेचे सीईओ निलेश नलवडे, समन्वयक प्रशांत तनपुरे, नितिन खारतोडे, आर.आर.कदम, संतोष लोणकर, शरद ताटे, सोनाली काटकर, चंद्रकांत जराड, वर्षा देवकाते इत्यादी शिक्षक व पालक उपस्थित होते.

हिना इनामदारचे धाडस...!

माहेरची अर्थिक स्थिती बिकट, वृद्ध आई-वडील, पाच बहिणी, 11 वर्षापूर्वी लग्न झालेले आणि लग्नानंतर 2 मुले झालेल्या अशा समस्यांना तोंड देत मुरूम गावच्या हिना इनामदार पोलिस भरती झाल्या. त्यांच्या धाडसी स्वभावाला दाद देत सुनंदा पवार यांनी हिना मॅडमचे विशेष कौतूक केले. तसेच कौटुंबिक जबाबदारी असतानाही हिनाताईंनी मिळविलेल्या यशाबद्दल गावकऱ्यांनीही अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election Result 2026 : ठाकरे गटावर दुहेरी आघात ! मुंबईतील सत्ता जाताच काही वेळातच शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदाराचे हृदयविकाराने निधन

Kolhapur Municipal Politics : कोल्हापुरात महायुतीचा पहिला महापौर कोण? नेत्यांकडून नगरसेवकांच्या बैठकीची वेळ तारीख ठरली

मुंबईत मोठा भाऊ झाला छोटा! शिंदेंनी ठाकरेंचे ६२ नगरसेवक फोडले, ९० जागा लढल्या पण जिंकले फक्त २९; स्ट्राइक रेट गंडला

अभि - क्रितिकाच्या केळवणानंतर आता हळदीचा जल्लोष ! ‘लग्नाचा शॉट’ शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला

Shivsena Uddhav Thackeray : ठाकरेंच्या शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’

SCROLL FOR NEXT