mpsc sakal
पुणे

पुणे : लॉकडाऊनच्या नावाखाली राज्य सरकारने अडवल्या नियुक्त्या

विविध परीक्षांचे तब्बल ४२९ उमेदवार नियुक्त्यांपासून वंचित

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्य सरकारचा स्पर्धा परीक्षांच्या नियुक्त्यांचा गोंधळ काही कमी होताना दिसत नाही. २०१९ या वर्षात एमपीएससी आणि सरळसेवा परीक्षांच्या लागलेल्या निकालातून विविध परीक्षांच्या तब्बल ४२९ नियुक्त्या दिल्या गेल्या नसल्याचे चित्र तपासणीतून समोर आले आहे. एकीकडे आरोग्य भरतीच्या परीक्षेच्या नियोजनाबाबत गोंधळ सुरू असतानाच नियुक्त्यांचा घोळ देखील समोर आला आहे. कोरोनाचा देशभरात प्रादुर्भाव सुरू होण्याआगोदर २०१९ या वर्षात विविध पदांच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले होते. त्यानंतर नियुक्त्यांची प्रक्रिया सूर असतानाच मार्च २०२० पासून देशभरात टाळेबंदी घोषित करण्यात आली.

त्यामुळे सुरू असलेल्या नियुक्तीप्रक्रियेत खंड पडला. लॉकडाऊन होण्यापूर्वी नियुक्ती मिळालेले उमेदवार कामावर रुजू देखील झाले, मात्र लॉकडाऊनमूळे नियुक्त्या थांबलेल्या उमेदवारांवर आता बेरोजगारीची वेळ आली आहे. परीक्षा पास होऊनही समाजात बेरोजगार म्हणून वावरावे लागत असल्याने प्रचंड मानसिक आणि आर्थिक त्रासाला या विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे.

लॉकडाऊनमूळे प्रलंबित राहिलेल्या नियुक्त्या

लॉकडाऊनमूळे प्रलंबित नियुक्त्या

१. सहायक मोटार वाहन निरीक्षक: ४७

२. सयुंक्त गट क परीक्षा लिपिक टंकलेखक: १५२

३. लेखा व कोषागार भरती: १३२

४. ग्रंथपाल आदिवासी विभाग ठाणे: ०४

५. कृषी सेवक भरती लातूर: ९४

स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतर रेंगाळलेली नियुक्तीप्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे आश्वासन राज्य सरकार कडून देण्यात आले; मात्र घोषणेपलीकडे वास्तवात काहीच हालचाल झाली नसल्याचे दिसत आहे. नियुक्तीप्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी संबंधित विभागांना पत्राद्वारे, निवेदनाद्वारे आणि प्रत्यक्ष भेटून करून सुद्धा काहीच हालचाल होत नसल्याने विद्यार्थी पुरते हावालदिल झाले आहेत. लॉकडाऊन आला त्यात आमचा काय दोष ? असा उद्विग्न सवाल आता ते करीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी याबाबत तातडीने बैठक घेऊन लॉकडाऊनमूळे थांबलेली नियुक्तीप्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश संबंधित विभागांना द्यावेत अशी मागणी प्रलंबित उमेदवारांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray CJP protest : आदित्य ठाकरे निवडणूक आयुक्तांना थेट गद्दार म्हणाले, ‘गद्दार ज्ञानेश गेलेच पाहिजेत’; CJPच्या आंदोलनाला पाठिंबा

Pune News : पुणे महापालिकेचा कारभार 'रामभरोसे'; प्रमुख अधिकारी, पदाधिकारी परदेशात

Cockpit attack: 'मोठी किंमत मोजावी लागेल', कॉकपिट घटनेवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा इशारा

Alandi News : 36 विद्यार्थी सुखरूप आळंदीत परतले; पोलीस ठाण्यात पालकांच्या ताब्यात

Latest Marathi News Live Update : भारताच्या लेकींनी रचला इतिहास! चीनचा पराभव, ४४ वर्षांनंतर हॉकीत सूवर्णपदक

SCROLL FOR NEXT