Daund Junction Sakal
पुणे

Daund Railway Junction : दौंड रेल्वे जंक्शनचा पुणे विभागात समावेश करण्यास मंजूरी

केंद्र सरकारने दौंड रेल्वे जंक्शन या स्थानकाचा सोलापूर ऐवजी पुणे विभागात समाविष्ठ करण्यास मंजूरी दिली आहे.

प्रफुल्ल भंडारी

दौंड - केंद्र सरकारने दौंड रेल्वे जंक्शन या स्थानकाचा सोलापूर ऐवजी पुणे विभागात समाविष्ठ करण्यास मंजूरी दिली आहे. एक एप्रिल २०२४ पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

रेल्वे बोर्डाचे सचिव अरूण नायर यांनी दौंड रेल्वे स्थानकाचा सोलापूर ऐवजी पुणे विभागात समाविष्ठ करण्यासंबंधी २१ फेब्रुवारी रोजी अधिसूचना जाहीर केली आहे. दौंड - पुणे लोहमार्गावर पाटस (ता. दौंड) स्थानकाच्या आधी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाची सुरू होते मात्र दौंड स्थानकाचा सोलापूर विभागात समावेश आहे.

दौंड-सोलापूर-वाडी आणि दौंड-नगर-अंकाई (ता. येवला, जि. नाशिक) पर्यंतच्या मार्गांचा सोलापूर रेल्वे विभागात समावेश आहे. तर दौंड रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या पुणे-दौंड-बारामती रेल्वे खंडाचा पुणे विभागात समावेश आहे. सध्या दौंड स्थानकावर सोलापूर व पुणे विभागाचे दुहेरी नियंत्रण आहे.

दौंडपासून सोलापूर रेल्वेस्थानकाचे अंतर १८७ किलोमीटर तर पुण्याचे अंतर अवघे ७५ किलोमीटर आहे. दौंड येथे सोलापूर विभागाचे काही उप विभागीय कार्यालये आहेत, परंतु अंतिम निर्णय सोलापूर विभागीय कार्यालयातील वरिष्ठ घेत असल्याने त्यांच्यावर अवलंबून राहावे लागत आहे. प्रशासकीय कामे जलद गतीने होण्यासाठी पुणे सोयीचे असल्याने दौंड रेल्वे स्थानकाचा समावेश करण्याची मागणी दशकापासून प्रलंबित होती.

प्रवासी आणि नागरिकांना प्रशासकीय, भौगोलिक, आर्थिकदृष्ट्या सोलापूर पेक्षा पुणे विभाग सोईचा असल्याने रेल्वे प्रशासनाने दौंडचा समावेश पुणे विभागात करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी सातत्याने केली होती. लोकसभेच्या अधिवेशनात यासंबंधी प्रश्न उपस्थित करून त्यांनी त्याचा पाठपुरावा केला होता.

दौंड-पुणे-दौंड दैनंदिन प्रवास करणारे हजारो प्रवासी, रेल्वेचे कार्यरत आणि सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी, मालवाहतूकदार, आदींना दौंडचा समावेश पुणे विभागात करण्यासंबंधी निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. अनेक वर्षांची मागणी पूर्ण केल्याबद्दल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे खासदार सुप्रिया सुळे यांनी विशेष आभार मानले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ACB Raid In Kolhapur : नगर घडवण्याऐवजी नगराची वाट लावणाऱ्या अधिकाऱ्यावर लाचलुचपत विभागाची कारवाई, कोल्हापुरातील घटना

Pandharpur News: पंढरपुरातील विठुरायाची श्रीमंती वाढू लागली; पाच वर्षांत २०० कोटींचे उत्पन्न, सात पटीने वाढ; ७ कोटी भाविकांची हजेरी!

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्र पाच वर्षांत घेणार ‘अर्थभरारी’; जग मंदावले... पण राज्याची प्रगती सुसाट

Solapur Airport: सोलापूरहून इंदौरला बुधवारपासून विमानसेवा; वनस्टॉप विमानसेवा, मुंबईला जाणारे विमान हेच पुढे इंदौरला जाणार!

Latest Marathi News Live Update : पुण्यात पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT