approval at the PCMC general meeting for the construction of an international standard multi-purpose stadium at Moshi 
पुणे

मोशी येथे उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे बहुउद्देशीय स्टेडिअम

सकाळवृत्तसेवा

भोसरी : मोशी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बहुउद्देशीय स्टेडिअम उभारण्यात येत आहे. या कामाला महापालिका सर्वसाधारण सभेमध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

पिंपरी-चिंचवड पर्यायाने भोसरी विधानसभा मतदार संघात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडिअम उभारण्याचा संकल्प ‘व्हीजन-२०२०’अंतर्गत आमदार लांडगे यांनी केला होता. त्या अनुषंगाने तब्बल २५ हजार आसन क्षमतेचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम उभारण्यात येणार आहे. ११ एकर जागेवरील या उपसुचनेच्या प्रस्तावाला महापालिका सर्वसाधारण सभेत मंगळवारी मंजुरी देण्यात आली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आमदार लांडगे यांनी भोसरी विधानसभा क्षेत्रात ललित कला विभाग, शासकीय इंजिनीअरिंग महाविद्यालय, एज्युकेशन सेंटर सुरु करण्यसाठी प्रयत्न केले. त्याला यशही मिळाले. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्टेडीयममुळे भोसरीच्या नावलौकिकात भर पडणार आहे.  

पिंपरी-चिंचवड महापालिका सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर माई ढोरे होत्या. मोशी येथील सर्वे नं. ४४४ (जुना ४४५) आरक्षण क्रमांक १/ २०४ येथे बहुउद्देशीय स्टेडिअम उभारण्याच्या प्रस्तावित कामाला प्रशासकीय मान्यता द्यावी, अशी उपसूचना माजी महापौर नितीन काळजे यांनी दिली होती. या उपसूचनेला माजी महापौर राहुल जाधव यांनी अनुमोदन दिले आहे. सुमारे ३०० कोटी रुपये खर्च करुन हे बहुउद्देशीय स्टेडिअम उभारण्यात येणार आहे. त्याला सर्वसाधारण सभेची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

मोठी बातमी: शिक्षण सेवक भरतीला राज्य सरकारचा हिरवा कंदील; 6 हजार जागांसाठी होणार भरती​


''पिंपरी-चिंचवड शहराला अद्याप आंतराष्ट्रीय दर्जाचे एकही स्टेडिअम नाही. शहरातील क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने प्रस्तावित स्टेडिअम महत्त्वाकांक्षी ठरणार आहे. या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून, आता प्रकल्प सल्लागार नेमण्यात येईल. त्यानंतर आराखडा मंजूर करुन निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल. आगामी दोन ते अडीच वर्षांमध्ये स्टेडिअमचे काम पूर्ण होईल. या स्टेडिअममुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर शहराची ओळख निर्माण होईल.''
– संजय साळी, उपअभियंता, बीआरटीएस विभाग.

''आम्ही क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी अन्य शहरांमध्ये देशात किंवा देशाबाहेरही गेलो आहे. त्यावेळी आपल्या शहरामध्ये अशाप्रकारचे भव्य स्टेडिअम असावे. देश-विदेशातील खेळाडू आपल्या शहरात यावेत. आपल्या शहराचे नाव क्रीडा क्षेत्रात अग्रक्रमाने घेतले जावे. शहरातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे, अशी भावना होती. त्यामुळेच महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करुन आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडिअम उभारण्याचे काम हाती घेतले आहे.''
– महेश लांडगे, आमदार, भोसरी, विधानसभा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audi footpath crash: दिल्लीत भयानक अपघात! ऑडी चालकाने फूटपाथवर झोपलेल्या ५ जणांना चिरडले

Sugarcane FRP : सरकारच्या एका निर्णयामुळे साखर कारखाने येणार अडचणीत, इनकम टॅक्स विभागाची राहणार करडी नजर; शेतकऱ्यांनाही फटका

'ते' सिद्ध करा, मी राजकारणातून संन्यास घेतो, अन्यथा सतेज पाटलांनी संन्यास घ्यावा; आमदार क्षीरसागरांचं ओपन चॅलेंज

Latest Marathi News Updates : मराठीबहुल मतदारसंघातील लोकप्रतिनिधींना भेटणार; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचा निर्णय

Nitin Gadkari: शिक्षण क्षेत्रात अनेक समस्या! शिक्षकांच्या ॲप्रूव्हल अन् अपॉइंटमेंटसाठीही पैसे लागतात, नितीन गडकरींचा परखड टोला!

SCROLL FOR NEXT