lockdown 
पुणे

इंदापुरातील या गावांचा परिसर "सील' 

प्रा. प्रशांत चवरे

भिगवण (पुणे) : इंदापूर तालुक्‍यातील भिगवण, तक्रारवाडी, डिकसळ, मदनवाडी चौफुला हा तीन किलोमीटरचा परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे.

या परिसरातील अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर कोणत्याही सेवा सरकारचा पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत. किराणा व भाजीपाला आदी बाबीही संबंधितांना घरपोच देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा इशारा भिगवण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी दिला आहे. 

सरकारने सोमवारपासून (ता. 4) वेगवेगळ्या झोनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली आहे. त्यामुळे भिगवण परिसरातील व्यावसायिक व ग्राहकांमध्येही याबाबत उत्सुकता होती. परंतु, भिगवण स्टेशन येथे कोरोना संक्रमित रुग्ण आढळल्यामुळे भिगवण स्टेशन, भिगवण, तक्रारवाडी, डिकसळ व मदनवाडी चौफुला आदी भाग हा कंटेन्मेंट झोन जाहीर केला आहे. हा परिसर सरकारने सील केला आहे.

या भागामध्ये अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर सेवा प्रतिबंधित केल्या आहे. नागरिकांनीही विनाकारण घराबाहेर फिरणे टाळावे, तसेच अत्यावश्‍यक सेवांसाठी बाहेर पडताना मास्क, सॅनिटायझेशन आदी काळजी घेणे आवश्‍यक आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागात दारूची दुकाने सुरू झाली आहे. त्यामुळे भिगवण परिसरातील दारूची दुकानेही सुरू होतील, अशी आशा बाळगून असलेल्या तळीरामांची मात्र निराशा झाली. 

याबाबत भिगवण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने म्हणाले, भिगवण स्टेशनपासून तीन किलोमीटरचा परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. हा परिसर पुढील आदेश येईपर्यंत सील करण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर कोणत्याही सेवा सुरू होणार नाही. नागरिकांनी संयम बाळगून प्रशासनास सहकार्य करावे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT