Pune_Police_Gaja_Marne 
पुणे

पुणे पोलिसांची सेंच्युरी; गजा मारणे मिरवणुकीप्रकरणी आतापर्यंत १०० जणांना अटक

सकाळ वृत्तसेवा

पुणे : फेब्रुवारीमध्ये तळोजा तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर गुंड गजा मारणेच्या समर्थकांनी रॅली काढली होती. या प्रकरणी पुणे पोलिसांनी आतापर्यंत १०० हून अधिकजणांना अटक केली आहे. जवळपास ३० हून अधिक आलिशान गाड्या या रॅलीचा भाग होत्या. त्या गाड्याही पोलिसांनी जप्त केल्या आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

गुंड गजा मारणे आणि त्याच्या १३ साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. संतोष हिरामण गावडे उर्फ पप्पू याच्या हत्येप्रकरणी पुरेशा पुराव्यांअभावी त्या सर्वांना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. 

तसेच अमोल बधे याच्या हत्येप्रकरणी कोर्टाने मारणे आणि त्याच्या २१ साथीदारांना निर्दोष ठरवले आहे. गावडे आणि बधे हे दोघेही मारणेचा प्रतिस्पर्धी निलेश घायवळ टोळीशी संबंधित होते. ४ नोव्हेंबर २०१४ रोजी गावडे याची गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते, तर २९ नोव्हेंबर २०१४ रोजी बधे याची हत्या करण्यात आली होती. 

गुंड गजा मारणेच्या निर्दोष सुटकेनंतर तळोजा जेलपासून ते कोथरूड येथील मारणेच्या घरापर्यंत शेकडो आलिशान गाड्यांच्या ताफ्यात मिरवणूक काढण्यात आली होती. याचा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच इतर नेत्यांनी महाराष्ट्र पोलिसांवर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर पुणे, पिंपरी-चिंचवड, रायगड आणि नवी मुंबई या मार्गे प्रवास करणाऱ्या मारणेच्या साथीदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. 

कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्यानंतर आतापर्यंत १०१ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच २७ आलिशान (हाय-एंड) गाड्याही जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच पुण्यातील अन्य पोलिस ठाण्यांमध्ये तसेच इतर कार्यक्षेत्रात जेथे गुन्हे नोंदवले गेले आहेत, त्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती कोथरूड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मेघश्याम डांगे यांनी दिली. 

या मिरवणूक प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी गजा मारणेला सातारा येथे अटक केली. महाराष्ट्र धोकादायक उपक्रम अधिनियम (MPDA) कायद्यांतर्गत मारणेची रवानगी येरवडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. तसेच मारणेच्या टोळीतील साथीदारांविरोधात यापुढेही मोक्का चालवण्याचा विचार पोलिस करत असल्याची माहितीही एका पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे. 

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीने १५व्या मजल्यावरून मारली उडी, घटनास्थळी सापडली चिट्ठी

Shiv Sena Symbol Dispute : शिंदे गटाने ठाकरेंचे दावे खोडले मूळ पक्षाचा प्रतिनिधी गट ठरविण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार

UPI Transaction Charges : UPI वर ०.४ टक्के शुल्क; १० हजार, १ लाख, १० लाखांच्या व्यवहारावर किती रुपये? जाणून घ्या

Marathi News Live Updates : नागपुरात भरधाव कारचा भीषण अपघात, ७ जणांना उडवलं

Helicopter Crash : भीषण अपघात! हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये कोसळलं, ३ जणांचा जागीच मृत्यू, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT