LEOPARD 
पुणे

मुलं अंगणात खेळत होती...अन्‌ तिथे आला बिबट्या... 

युनूस तांबोळी

टाकळी हाजी (पुणे) : ""मुलं अंगणात खेळत व्हती... मी पण त्यांच्याजवळच अंगणात खुर्ची टाकून बसलो होतो. त्यावेळी कालव्याच्या बाजूने दबक्‍या पावलांनी आलेल्या बिबट्यानं अंगणातील शेळीच्या करडाचं मानकुट धरलं. त्यानं देखील एकदाच "क्‍याव' केलं अन्‌ बिबट्यानं कालव्याच्या बाजूला धूम ठोकली...'' माळवाडी (ता. शिरूर) येथील बिबट्याने केलेल्या हल्लाची घटना शेतकरी रामदास भाकरे सांगत होते. त्यावेळी त्यांच्या पत्नी करुणा या रडवेल्या स्वरात म्हणाल्या, ""करडू उचलून नेलं, पण मुलं अंगणात खेळत होती, त्यांना काही दगा फटका झाला असता तर...'' 

माळवाडी (ता. शिरूर) येथील प्रशांत रामदास भाकरे यांच्या शेळीचे तीन ते चार महिन्याचे करडू गुरुवारी (ता. 30) सायंकाळी बिबट्याने थेट अंगणात येऊन उचलून नेऊन ठार केले. मात्र, त्यावेळी त्यांच्या घरातील लहान मुळे अंगणात खेळत होती; तर त्यांचे वडील रामदास भाकरे हे अंगणात बसलेले होते. त्यांच्या डोळ्यासमोरच बिबट्याने करडावर हल्ला केला. याबाबतची माहिती देताना त्यांचा व त्यांच्या पत्नीचा स्वर रडवेला झाला होता. या घटनेचा वनरक्षक सविता चव्हाण, संजय पावसे, ऋषीकेश लाड यांनी पंचनामा केला. 

दरम्यान, माळवाडी येथेच गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास ज्ञानेश्वर रसाळ हे टॅक्‍टर घेऊन घरी निघाले होते. त्यावेळी बिबट्याने गुरगुरत त्यांच्यावर हल्ला केला. मात्र, ट्रॅक्‍टर जोरात चालविल्याने ते बचावले. तसेच, मध्यरात्री एकच्या सुमारास रामचंद्र नामदेव भुजबळ, प्रशांत संजय भाकरे हे शेताला पाणी देत होते. त्यांनीही चार बिबट पाहिले. यामध्ये तीन बछडे व एक मादी असल्याचे त्यांनी सांगितले. 

कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे नागरिकांना घरातच बसू राहावे लागत आहे. त्यात बाजारभाव नसतानाही रात्रीच्या वीज पुरवठा सुरू होतो. त्यामुळे शेतीला पाणी देऊन पिके जगवायची तारेवरची कसरत करावी लागते. या परिसरात बिबट्याच्या होणाऱ्या हल्ल्यामुळे मोठे संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे. पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी सोमा भाकरे यांनी केली. 

उसाची तोड झाल्यामुळे त्यांचा आडोसा खुला झाला आहे. त्यामुळे बिबटे सध्या सैरभैर झाले आहेत. शेतकऱ्यांनी वनविभागाने दिलेले नियम पाळावेत. या परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त केला जाईल. 
- सविता चव्हाण
वनरक्षक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup साठी आज भारतीय संघाची घोषणा, कुणाला संधी, कोण बाहेर? 'या' पाच प्रश्नांची मिळणार उत्तरं...

BMC Elections: देशातील हिंदू 1992 पुन्हा घडवण्यासाठी तयार... BMC निवडणुकीपूर्वी धीरेंद्र शास्त्रींचं मुंबईत वक्तव्य! राजकीय अर्थ काय?

Pune Mumbai Journey : पुणे-मुंबई प्रवास आता ९० मिनिटांत! नवीन द्रुतगती मार्गाच्या ‘डीपीआर’ला मंजुरी

New Year Upday 2026: नवीन वर्षात 'या' खास उपायांचे शांतपणे करा पालन, वर्षभर आर्थिक समस्यांचा करावा लागणार नाही सामना

Latest Marathi News Live Update : नागपूर महापालिका निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीची दहा उमेदवारांची पहिली यादी जाहीर

SCROLL FOR NEXT