पुणे

मनाचिये वारी : वारकऱ्यांच्या हृदयातच वसतो पांडुरंग

तृप्ती भोईर, अभिनेत्री

आषाढी वारी हा भक्तीचा महासागर आहे, त्यामध्ये डुंबणाऱ्या प्रत्येकाला त्या भक्तीची प्रचिती येत असते. देव आणि भक्त यांना भावाच्या रेशीमगाठीने वारी जोडून ठेवते. तेथे समानता हाच धर्म पाळला जातो. कोणी उच्च-नीच, गरीब-श्रीमंत ही भावनाच तेथे नसते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

येथे सर्व असतात ते माउली...! काही धर्मांमध्ये अनेक अटी-नियम असतात. मात्र, वारीत ‘स्व’चा विसर पडतो. येथे प्रत्येक जण ‘माउली’ होतो. वर्षभर शेतात राबणाऱ्या शेतकरी महिलांसाठी ही वीस दिवसांची भक्तीची सहल असते. त्यात त्यांना पूर्ण स्वातंत्र्य असते. वारीत त्या खेळ खेळतात, गाणी गातात, मनसोक्त नाचतात... त्यातून त्या आनंद घेतात.

मी दोन वर्षे पूर्ण पायी वारी केली, तेव्हा मला असे जाणवले, की वारी तुम्हाला जीवन म्हणजे काय हे शिकवते. आपण कारण नसताना स्वतःभोवती डोलारे उभे करत असतो.

नको असलेल्या गरजा जीवनाला चिकटवून घेतो. त्या पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर धावाधाव करतो. जीवन जगण्यासाठी खूप कमी गोष्टींची गरज असते, याची जाणीव मला वारीत झाली. वारीच्या वातावरणात तुम्हाला आनंदाची अनुभूती मिळते. तुम्हाला कितीही दुःख असले, तरी तुम्ही त्या भक्तिमय वातावरणात ते विसरून जाता. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा वारी नाही, ही बाब माझ्यादृष्टीने चांगली आहे. आपण वारीला गेलो आणि अन्य कोणाला आजार होण्यास कारणीभूत ठरलो, हे अध्यात्म वारीत चालणाऱ्या वारकऱ्यांना मान्यच असू शकत नाहीत. कारण सामाजिक भावनांचा समुदाय म्हणजे पंढरीची वारी आहे, त्यामुळे सामाजिक भान राखूनच वारकरी वारीत जगत असतो. अशा साथीच्या काळात एका ठिकाणी बसून राहणे, हीच खरी वारी ठरेल.

त्यामुळे वारकऱ्यांनी यंदा वारीत जाऊ नये. तुम्ही पायी न जाण्याचे कारण विठ्ठलाला माहीत आहे. आजवर तुम्ही कोणतीही अपेक्षा न ठेवता त्याची वारी करीत आलात. आता जगावरच्या संकटाच्या काळात तोच तुम्हाला भेटायला येईल. सद्विचारातून प्रत्येक वारकऱ्याच्या हृदयात पांडुरंग वसलेला असतोच. तो वारीपुरता नव्हे, तो वर्षभर वारकऱ्यांमध्ये असतो. त्यामुळे वारीत जी भजन, साधना करत होतात, तीच घरात बसून करा. तुमचे वारीतील आनंददायी अनुभव एकमेकांना सांगत वारीचा आनंद घ्या. आपण सारेच विठ्ठलाला कोरोनाच्या संकटापासून मुक्तीचे साकडे घालूया. 
(शब्दांकन - शंकर टेमघरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Railway : कोकणवासीयांवर अन्याय! दादर-रत्नागिरी पॅसेंजरबाबत रेल्वेमंत्र्यांच्या आदेशालाही केराची टोपली; रेल्वे प्रशासनाचा मनमानी कारभार

Sangli Rain Update : किती मिलिमीटर पाऊस पडल्यावर करावी खरीप पेरणी? हंगामातील पेरणीचे 15 दिवस वाया, शेतकऱ्यांच्या हातात अजून किती दिवस शिल्लक?

Latest Marathi News Live Update : जंतर मंतर वर तीन दिवसापासून कोकरोज जनता पार्टीचे आंदोलन सुरू

Thane News: दुपदरीवरून एकपदरी... MMRDAचा वादग्रस्त पूल अखेर खुला, वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार

कामाच्या ठिकाणी प्रेम टिकू शकतं का? 'प्रेमाला कंडिशन्स अप्लाय'मधून भेटीला येणार नवी कोरी जोडी! नक्की काय आहे कथा?

SCROLL FOR NEXT