vinod-vidwans 
पुणे

कृत्रिम बुद्धिमत्तेतून साकारली बंदिश

संतोष शाळिग्राम

पुणे - संगणक शास्त्रीय गायन वा वादन करू शकेल का?... कधीकाळी वाटणारी ही शक्‍यता आता मात्र प्रत्यक्षात उतरण्याच्या टप्प्यावर आली आहे. पुण्यातील डॉ. विनोद विद्वांस या प्राध्यापकाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशियिल इंटेलिजन्स) वापर करून संगणकाला शास्त्रीय बंदिशीची (गत) रचना करायला लावली आहे. 

संगीतात शास्त्र असेल, तर ते संगणकानेही वाजविले पाहिजे, असा विचार करून त्यांनी पंधरा वर्षांपूर्वी संशोधन करण्यास सुरुवात केली. त्यात आता त्यांना यश मिळू लागले आहे. त्यासाठी त्यांनी एक संगणकप्रणाली तयार केली असून, एखाद्या रागाचे आरोह-अवरोह आणि वादी-संवादी स्वर त्यात टाकले आणि वादनासाठी एखादे वाद्य, तसेच ताल निवडला की त्या रागातील एक ते तीन मिनिटांची सांगीतिक रचना (गत) तयार होते.

संगणकाला स्वत:लाच संगीत रचना करता यावी यासाठी त्यांनी नाट्यशास्त्र आणि संगीत रत्नाकर यांतील नियमांचे कोडिंग तयार केले. शास्त्रीय संगीतातील अलंकार, आलाप, पकड, ताना, श्रुती, तबल्याचे ताल तयार करण्याचे नियम आणि राग विस्ताराचे मॉडेल तयार करून ते संगणक प्रणालीत टाकले. यातून संगणकातून गत तयार होऊ लागली आहे. संगणकाला राग, ताल आणि वाद्याची माहिती दिल्यानंतर रचनेची तो गद्य (टेक्‍स्ट) फाइल तयार करतो. त्याचे ऑडिओ फाइलमध्ये रूपांतर केले, की ही रचना संगणकाच्या आवाजात ऐकता येते. बंदिशीची रचना, आलाप, ताना आणि हरकतीदेखील संगणक तयार करतो आणि ते ऐकवतोही.

पुण्यात फ्लेम विद्यापीठात कार्यरत असलेले विद्वांस या संशोधनाविषयी सांगतात, ‘‘१९९१ मध्ये मुंबईत आयआयटीमध्ये असताना संगणकाची ओळख झाली. त्या वेळी शास्त्रीय संगीतदेखील शिकत होतो. तेव्हा या संशोधनास सुरुवात झाली. पंधरा वर्षांच्या प्रयत्नाला आता यश येत आहे. संगणक स्वत:च गाणी तयार करू लागला आहे; तो त्याच्या आवाजात ऐकवू लागला आहे. यात पारंपरिक वाद्यांचा गोडवा वाटत नसला, तरी मूळ वाद्यांचे स्वर ऐकू येण्यासाठी प्रयत्न करीत आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND A vs AUS A, 1st ODI: पाटीदार लढला, पण बाकी सारे ढेपाळले; भारताचा संघ १४९ वर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

SCROLL FOR NEXT