पुणे : लाॅकडाऊनमुळे घरात बसून वैताग आला, काम बंद आहे, पण अशाही स्थितीतही चित्रकार त्यांच्या कुंचल्यांमधून रंगाची उधळण करत आहेतच. एवढेच नाही तर चित्रकला शिकण्यासाठी ऑनलाईन क्लासेस, वर्कशॉप सुरू झाले आहेत. तर कोणी चित्रकलेची स्पर्धा आयोजित करून मुलांच्या, पालकांच्या आयुष्यात नवे रंग भरत आहेत. लाॅकडाऊनचा सद्उपयोग होत असल्याने हे कलाकार समाधान व्यक्त करत आहेत.
एक महिना झाला लाॅकडाऊन सुरू असल्याने श्रीकृष्ण वागेश्वरी याचा कोथरूड येथील ओरिजीन आर्ट स्टुडिओ बंद आहे. त्यामुळे टॅटू काढण्यात तरबेज असलेल्या श्रीकृष्णने लाॅकडाऊनमध्ये घरातून ऑनलाईन क्लास व वर्कशॉप घेणे सुरू केले. ज्यांना चित्रकला शिकावी वाटत आहे, अशांना तो व्हिडिओ काॅलच्या माध्यमातून शिकवत आहे. इतके दिवस इच्छा असूनही चित्रकला शिकु शकलेल्या महिलांसह, मुलांसह पालकही सहभागी होत आहेत.
कृष्णा म्हणाला, "दोन दोन दिवसांचे वर्कशॉप घेत आहेत. त्याच्या स्वतःच्या आणि स्टुडिओच्या नावावे असलेल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून अनेक जण चौकशी करतात. तसेच पोट्रेट काढून देण्याची मागणी वाढत आहे. लाॅकडाऊनमुळे ऑनलाईन चित्रकला शिकविण्याचा मिळालेला पर्याय उत्तम असल्याने नवी संधी उपलब्ध झाली आहे.
ग्राफिक्स डिझायनर असलेले राहुल फुगे हे भोसरी येथे राहतात. ट्रेकिंगची आवडत असल्यास आत्तापर्यंत अनेक मोहिमा केल्या आहेत. यापैकी रायगड, लोहगड, राजगड, तुंग, हरिश्चंद्र गड, रतनगड अशा किल्ल्यांसह सांदण दरी, कोकण यांचे लाॅकडाऊन काळात त्यांचे हुबेहुब चित्र रेखाटले. हौस म्हणून हे चित्र काढून फेसबुकवर शेअर केले. या दर्जेदार चित्रांना प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला असून, आम्हाला ही असे चित्र काढून मिळतील का अशी चौकशी नेटकरी करत आहेत.
राहुल फुगे म्हणाले, "चित्रांबद्दल तर चौकशी होतच आहे. कोल्हापूर, सांगली, नाशिक, पुणे येथील ट्रेकिंग करणारे नवे लोक जोडले गेले आहे. तसेच अनेक निसर्गचत्रही काढले आहेत. लाॅकडाऊनचा सद्उपयोग झाला आहे.
चित्रकला स्पर्धेला मिळाला प्रतिसाद
'कोरोना'चा प्रभाव वाढत असल्याने नकारात्मक चर्चा सर्वत्र होत आहे. यातून बाहेर पडण्यासाठी वेगळा काही तरी उपक्रम राबविला पाहिजे यासाठी आयटी इंजिनिअर असलेले सुनिल टक्के यांनी ऑनलाईन चित्रकला स्पर्धा घेण्याचा प्रस्ताव मित्रांसमोर मांडला. यामध्ये मन प्रसन्न व्हावे यासाठी निसर्गचित्र काढण्यास सांगण्यात आले होते.
लहान मुलांसह मोठे लोक असे सुमारे ५० जण सहभागी झाले. हे चित्र सोशल मीडियावरून व्हायरल झाल्यानंतर अनेकांकडून पुन्हा एकदा स्पर्धा घ्या अशी मागणी होत आहे. "नकारात्मक वातावरणात काही तरी चांगले करण्यासाठी म्हणून ही स्पर्धा घेतली, त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. लाॅकडाऊन संपला की यातील विजेत्यांना ड्राइंग किट बक्षीस दिले जाणार आहे." असे टक्के यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.