Police Transfer esakal
पुणे

Pune News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

आगामी लोकसभा निवडणूक-२०२४ च्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस आयुक्तालयातील १७ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी बुधवारी (ता. २४) काढले.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : आगामी लोकसभा निवडणूक-२०२४ च्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस आयुक्तालयातील १७ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी बुधवारी (ता. २४) काढले. केंद्रीय निवडणूक आयोग आणि पोलिस महासंचालकांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

बदली झालेल्या पोलिस निरीक्षकाचे नाव आणि कंसात कोठून कोठे बदलीचे ठिकाण -

दादासाहेब चुडाप्पा (वरिष्ठ निरीक्षक फरासखाना ते वाहतूक शाखा), सुनील माने (वरिष्ठ निरीक्षक खडक ते गुन्हे शाखा), रवींद्र गायकवाड (वरिष्ठ निरीक्षक विश्रामबाग ते खडक), दीपाली भुजबळ (वरिष्ठ निरीक्षक गुन्हे शाखा ते विश्रामबाग),

हेमंत पाटील (वरिष्ठ निरीक्षक कोथरूड ते आर्थिक गुन्हे शाखा), संदीप देशमाने (वरिष्ठ निरीक्षक अलंकार ते कोथरूड), सुनील जैतापुरकर (वरिष्ठ निरीक्षक वारजे माळवाडी ते कोर्ट कंपनी), अक्षय महाजन (वरिष्ठ निरीक्षक सिंहगड रस्ता ते आर्थिक गुन्हे शाखा), विजय कुंभार (पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा (अभियोग कक्ष) ते वरिष्ठ निरीक्षक, सिंहगड रस्ता),

राजेंद्र सहाणे (वरिष्ठ निरीक्षक खडकी ते विशेष शाखा), गिरीश दिघावकर (पोलिस निरीक्षक (गुन्हे) भारती विद्यापीठ ते वरिष्ठ निरीक्षक, खडकी), बालाजी पांढरे (वरिष्ठ निरीक्षक चतु:श्रृंगी ते गुन्हे शाखा युनिट तीन), नीलिमा पवार (वरिष्ठ निरीक्षक कोरेगाव पार्क ते विशेष शाखा), अश्विनी सातपुते (पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा, अमली पदार्थ विरोधी पथक- एक) ते वरिष्ठ निरीक्षक कोरेगाव पार्क),

नीलम भगत (पोलिस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा ते कोर्ट आवार), श्रीहरी बहिरट (पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट-तीन ते गुन्हे शाखा अभियोग कक्ष), राजेंद्र लांडगे (पोलिस निरीक्षक नियंत्रण कक्ष ते गुन्हे शाखा अमली पदार्थ विरोधी पथक-१).

वारजे माळवाडी ठाण्यातील पोलिस निरीक्षक (गुन्हे) अजय कुलकर्णी आणि चतु:शृंगी येथील पोलिस निरीक्षक (गुन्हे) अंकुश चिंतामण हे पुढील आदेश होईपर्यंत अनुक्रमे वारजे माळवाडी आणि चतु:शृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक म्हणून कार्यभार पाहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FIFA World Cup 2026 : मेस्सी विरुद्ध रोनाल्डो QF मध्ये भिडणार; वर्ल्ड कप २०२६ चे गट जाहीर, डोनाल्ड ट्रम्प यांना 'शांतता' पुरस्कार

MPSC Exams 2026: एमपीएससी 2026 वेळापत्रक जाहीर; राज्यसेवा, वनसेवा, गट-ब–क परीक्षांचे दिनांक स्पष्ट

Panchang 6 December 2025: आजच्या दिवशी शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

क्रिकेटप्रेमींसाठी ६ डिसेंबर आहे खास...आज एक दोन नव्हे तर तब्बल ११ क्रिकेटपटूंचा वाढदिवस 'Birthday Special-11' एकदा वाचाच...

DK शिवकुमार-जारकीहोळी भेटीमागचे राजकारण गडद; सत्तावाटपावरून काँग्रेसमध्ये जोरदार हालचाली, संक्रातीपर्यंत निर्णय होणार?

SCROLL FOR NEXT