Ashadhi Wari 2023  
पुणे

Ashadhi Wari 2023: वारीमुळे पारधी समाजातील 150 जणांना डांबून ठेवले, अ‍ॅड. सरोदेंचा आरोपाने खळबळ

Sandip Kapde

Ashadhi Wari 2023 पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आज आळंदीतून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे. यामुळे लाखो भाविक आळंदीत दाखल झाले आहेत. दरम्यान धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  पारधी समाजातील तब्बल 127 ते 150 जणांना वारी आहे म्हणून आळंदी पोलीस स्टेशनमध्ये सकाळपासून डांबून ठेवण्यात आले आहे,  अ‍ॅडव्होकेट असिम सरोदे यांनी याबाबत फेसबूकवर पोस्ट करत आरोप केला आहे. 

असिम सरोदे यांनी फेसबूक पोस्ट केली आहे. त्यामध्ये काही प्रश्न उपस्थित केले आहेत. आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी अनेक पारधी समाजातील स्त्रीया, मुले व पुरुषांना कोणत्या कायद्यानुसार ताब्यात घेतले आहे?

छोटयाशा जागेत इतक्या जणांना डांबून ठेवल्याने अनेकांचा जीव गुदरम आहे. त्यांना खायला देण्यात आलेले नाही की त्यांना प्यायला पाणी नाही. आळंदी पोलीस स्टेशन झोन 1 च्या अखत्यारीत आहे तेथील सहायक पोलिस आयुक्त असतील त्यांना माझी विनंती की इन्स्पेक्टर सुनील गोडसे यांना कायदा हातात घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत का हे सांगावे, असे असिम सरोदे यांनी म्हटले आहे.  

कोणत्या शंकेवरून इन्स्पेक्टर गोडसे पारधी समजतील लोकांना इतक्या मोठ्या प्रमाणात अटक करून ठेवले? त्यांच्यावर गुन्हा नोंदवला का? अश्याप्रकारे मानवीहक्क उल्लंघन करण्याचा गोडसेंना अधिकार दिला कुणी?, असा सवाल देखील सरोदे यांनी उपस्थित केला आहे.

"पारधी समाजातील बांधवांना केवळ वारीच्या पार्श्वभूमीवर डांबून ठेवणे अन्यायकारक आहे. इन्स्पेक्टर सुनील गोडसे यांना विनंती की त्यांनी डांबून ठेवलेल्या पारधी समाज बांधवाना त्वरित सोडावे," अशी मागणी असिम सरोदे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Forecast : 500 मिमीवरून पाऊस थेट शून्यावर! पुणे, कोकण आणि घाटमाथ्यावरील पावसाला अचानक का लागला ब्रेक? 'आयएमडी'ने दिले स्पष्टीकरण

Pune Water Supply Update : पुणेकरांना दिलासा ! पाणी कपातीचे संकट तूर्तास टळले; खडकवासला धरणात समाधानकारक साठा

Latest Marathi News Update : पावसाअभावी कपाशी संकटात; कोरडवाहू शेतकऱ्यांची चिंता वाढली

भाईजान गॅलेक्सी अपार्टमेंट सोडणार? सलमान खानने विकली वांद्र्यातील प्रॉपर्टी, कोट्यवधींची डील

Pune Rainfall : पुण्यावर वरुणराजाची कृपेची सावली! मुळशी, पवना, खडकवासल्यात मागील वर्षापेक्षा अधिक पाऊस; धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही समाधानकारक पर्जन्यमान, ताजी आकडेवारी समोर

SCROLL FOR NEXT