पुणे

Ashadhi Wari : वारीनंतरही महिनाभर भजन, किर्तनाचा आवाज कानात घुमतो

'संतांनी दिलेल्या उपदेशाचे पालण करून समाजात आपण चांगलं वागलं पाहिजे. मोह, माया सगळं विसरून माणूस वारीला निघतो.

समाधान काटे

पुणे - 'संतांनी दिलेल्या उपदेशाचे पालण करून समाजात आपण चांगलं वागलं पाहिजे. मोह, माया सगळं विसरून माणूस वारीला निघतो. घरातून निघताना माणूस असतो दिंडीत सहभागी झाला की तो वारकरी होतो. वारीची परंपरा, संस्कृती, जगभर प्रसिद्ध आहे. वारी जगाला माणूसकीची शिकवण देते. म्हणून माणसाने आयुष्यात एकदा तरी वारी करावी.' असं सांगत होते जेष्ठ वारकरी नाना तौर.

वर्षानुवर्षे वारी करणाऱ्या वारकऱ्यांना अनुभव विचारले असता त्यांनी सांगितले की, 'माझ्या आईने एकही वारी चुकवली नाही.मी पण पंधरा वर्षे झालं वारी करीत आहे. माझा पाय दुखत असताना देखील मी आले आहे, पाय दुखायचं मनामध्ये सुद्धा राहिलं नाही. पांडुरंगाने सर्वांना चांगली बुध्दी द्यावी. सर्वांचे कल्याण करावे. गावागावात व जगभरात सुधारणा व्हाव्यात.

- रंजना जमदाडे, नांदेड

'मी ३५ वर्षापासून वारी करीत आहे. वारी केल्यावर मन प्रसन्न होतं.त्यामुळे आम्हाला आनंद वाटतो. माणसाचा जन्म कशासाठी झाला? माणसाचं कार्य काय? या गोष्टी वारीतून शिकता आल्या. आपण कसं वागावं, बोलावं वर्तणूक कशी असावी अशा अनेक गोष्टी वारीतून शिकलो. माऊली आणि तुकाराम यांनी जगाला दिलेला उपदेश याचं अनुकरण करत. राहायचं.'

- संतराम बादल, वारकरी बीड

'माऊलीचं दर्शन घेऊन पुढे पंढरीला जायचं. वाटेत काही कमी पडत नाही. वारीमध्ये घरची आठवण सुद्धा येत नाही. २८ वर्षापासून वारी करीत आहे. वारी झाल्यावर घरी गेल्यावर टाळ, मृदंग, वीणा भजन आणि किर्तनाचा आवाज आठ ते दहा दिवस डोक्यात घुमत राहतो.'

- पांडुरंग काळे, वारकरी परभणी

'वय झाल्यामुळे पाय दुखतात, चालणं होत नाही, दमा आहे, थकवा येतो. त्यामुळे वारीला कोणी घेऊन येत नाही. वारी निघाली की घरी बसू वाटत नाही. तरीपण मी वारीला आले आहे. विठ्ठलाने माझ्या मुलाला सुखी ठेवावं.'

- सत्यभामा ऐवले, वारकरी नांदेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

Maratha Reservation: मनाेज जरांगेंना ज्योती मेटेंचा थेट सवाल; ‘१२ मागण्या मान्य झाल्या, मग मुंबईला जाण्याचा हट्ट कशासाठी?’

Marathi News Live Updates : जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा तरुणांचा आक्रमक एल्गार, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

SCROLL FOR NEXT