Ashadhi Wari sakal
पुणे

Ashadhi Wari - आयटीयन्स पासून डॉक्टर्सपर्यंत, पुणेकर चालती लाडक्या दिवे घाटाची वाट!

संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पुणेकरांना पाहुणचार घेऊन पुढे प्रस्थान ठेवतो. त्याच वेळी भल्या पहाटे पुणेकरदेखील या भक्ती सोहळ्यात सहभागी होतात.

सकाळ वृत्तसेवा

Ashadhi Wari - श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुण्यात आगमन झाल्यावर लाखो वारकऱ्यांना चाहूल लागते ती पुढच्या टप्प्याची. शिस्तबद्ध पद्धतीने व्यवस्थापन होणाऱ्या या सोहळ्यातील पुढच्या १९ दिवसांसाठीचा शिधा, भाजीपाला यांची खरेदी करतानाच मुक्कामासाठी तंबूही घेतले जातात.

तसेच टाळ-मृदंगाची देखभाल दुरुस्ती, खरेदीही पुण्यात केली जाते. एकीकडे विठ्ठलाचा गजर होत असतानाच राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या वारकऱ्यांसाठीची काळजीही दिंडीप्रमुखांकडून घेतली जाते. त्याचा विविध क्षेत्रांतील गोष्टींचा ‘सकाळ’ने घेतलेला आढावा...

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी मार्गावरील वारकऱ्यांची परीक्षा पाहणारा टप्पा म्हणजे पुणे ते सासवड! या आव्हानात्मक मार्गावर वारकऱ्यांच्या बरोबरीने शहरातील विविध संस्था, संघटनांचे सदस्य खांद्यावर भागवत धर्माची पताका घेऊन वरीच्या वाटेवर चालतात. ही संख्या वर्षान् वर्षे वाढत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात येते.

पुणे ते सासवड पालखी तळ हे अंतर सुमारे ३२ किलोमीटरचे. यात मार्गात दिवे घाट येतो. साधारणतः चार किलोमीटरचा हा वळणा-वळणाचा रस्ता. अरबी समुद्र किनाऱ्याला समांतर असलेल्या सह्याद्री पर्वत रांगाचा हा भाग. समुद्र सपाटीपासून अंदाजे एक हजार मीटर (३२८० फूट) उंच आहे. ही अवघड वाट वारकऱ्यांच्या सोबत चालणाऱ्या पुणेकर भाविकांची संख्या दर वर्षी वाढत आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पुणेकरांना पाहुणचार घेऊन पुढे प्रस्थान ठेवतो. त्याच वेळी भल्या पहाटे पुणेकरदेखील या भक्ती सोहळ्यात सहभागी होतात. ‘ज्ञानोबा-तुकाराम’ अखंड जयघोषात ही झपाझप ही पावले वारीच्या मार्गावर पडू लागतात. गेल्या काही वर्षांमध्ये पुणेकरांच्या या उत्साहात सातत्याने वाढ होत आहे.

या बद्दल निरीक्षण नोंदवताना इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे शाखेचे माजी अध्यक्ष आणि कार्यकारी विश्वस्त डॉ. संजय पाटील म्हणाले, ‘‘आळंदी ते पुणे आणि पुणे ते सासवड अशा दोन टप्प्यांमध्ये वारी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

त्यात पुण्यातील डॉक्टरांचाही मोठा सहभाग असतो. पुण्याहून सासवडकडे पालखीच्या बरोबर चालताना ऊर्जेचा अखंड प्रवाह जाणवतो. इतर वेळी एखादा किलोमीटरही चालण्यासाठी पाऊल न टाकणारे अनेक जण सहज ही वारी वाट चालतात. इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे गेल्या १३ वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे.’’

‘आयटीयन्स’चाही सहभाग

या वाटेवर पर्यावरणाचा संदेश देणारी वारी सहभागी झालेली असते, तसेच महिला मंडळांची स्वतंत्र दिंडी याच वाटेवर चालते. माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात विविध पदांवर कार्य करणाऱ्या उत्साही तरुणांचा यात सहभाग असतो.

इतर वेळी ब्लेझर, टाय अशा वेशभूषेत वातानुकूलन कार्यालयात वावरणारे हे अभियंते या वेळी वारकऱ्यांच्या वेशात असतात. कपाळी केशरी गंध लावून, डोक्यावर टोपी आणि हातात टाळ घेऊन ‘ज्ञानेश्वर माउली ज्ञानराज माउली तुकाराम’च्या घोषात सासवडच्या दिशेने पावले उचलत असतात.

पर्यावरण दिंडी, जलदिंडी, आयटी दिंडी, शिक्षक दिंडी, उद्योजक दिंडी अशा वेगवेगळ्या दिंड्या उत्साहाने सहभागी होतात. यात वेगवेगळ्या विद्यापीठाचे विद्यार्थीही येतात. कोणी आरोग्य जनजागर करत असतो, तर कोणी प्लास्टिकचे पर्यावरणावरील दुष्परिणाम सांगत असतात. पंढरीच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्याच्या ओढीने निघालेल्या या वैष्णवांच्या मेळ्याला सहभागी होता आले, हीच मोठी भक्ती असल्याचे भावना असते.

प्रभाकर देशपांडे, वारीचे अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT