ashadi wari 2022 changes in traffic of pune on Sant Dnyaneshwar Maharaj and Sant Tukaram Maharaj Palkhi
ashadi wari 2022 changes in traffic of pune on Sant Dnyaneshwar Maharaj and Sant Tukaram Maharaj Palkhi  esakal
पुणे

पालखी सोहळ्यासाठी शहरातील वाहतुकीत बदल

सकाळ वृत्तसेवा

पुणे : संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या शहरातील आगमन, मुक्काम व प्रस्थानादरम्यान शहरात वाहतुक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतुक शाखेकडून मोठ्या प्रमाणात वाहतुकीमध्ये बदल केले आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन वाहतुक पोलिसांनी केले आहे. त्याचबरोबर वाहतुकीबद्दलची अद्ययावत माहिती नागरीकांना, वाहनचालकांना मिळावी, यासाठी ट्‌विटरद्वारे प्रत्येक क्षणाची माहिती देण्यात येणार आहे.

बुधवारी (ता.22) वाहतुकीतील बदल पुढीलप्रमाणे

संत तुकाराम महाराज पालखी मार्ग वाहतुक बदल : बंद रस्ते पर्यायी मार्ग

  • बोपोडी चौक ते खडकी बाजार - अंतर्गत रस्त्याने चर्च चौक

  • पोल्ट्री चौकाकडे येणारी वाहतुक - रेल्वे पोलिस मुख्यालयासमोरुन औंध रस्ता,ब्रेमेन चौकातुन पुढे

  • जुन्या मुंबई-पुणे मार्गावरील वाहतुक बंद - बोपोडी चौकातुन भाऊ पाटील रस्त्याने औंधमार्गे पुढे

  • आरटीओ ते अभियांत्रिकी महाविद्यालय चौक - आरटीओ, शाहीर अमर शेख चौक, कुंभार वेस

  • सादलबाबा दर्जा ते पाटील इस्टेट चौक - पर्णकुटी चौक, बंडगार्डन पुल, महात्मा गांधी चौक मार्गे पुढे

संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी मार्ग वाहतुक बदल : बंद रस्ते पर्यायी मार्ग

  • आळंदीकडे जाणारे रस्ते बंद - अंतर्गत व पर्यायी रस्त्यांचा वापर करावा

  • कळसफाटा, ते बोपखेल फाटा, विश्रांतवाडी चौक - धानोरी रस्त्याने अंतर्गत रस्त्यांचा वापर करावा

  • मेंटल हॉस्पीटल कॉर्नर, आळंदी रोड जंक्‍शन - जेल रोड, विमानतळ मार्गे पुढे

  • सादलबाबा दर्जा ते पाटील इस्टेट - पर्णकुटी चौक, गुंजन चौक, जेल रस्ता, गॅरीसन इंजिनीअरींग चौक, विश्रांतवाडी चौक

बुधवारी दुपारी 12 वाजल्यापासून बंद राहणारे रस्ते व पर्यायी मार्ग : बंद रस्ते पर्यायी मार्ग

  • रेंजहिल चौक ते संचेती चौक (गणेशखिंड रस्ता) - रेंजहिल्स, खडकी पोलिस ठाणे, सेनापती बापट रस्ता, नळस्टॉप चौक

  • खंडोजीबाबा चौक ते वीर चाफेकर चौक (फर्ग्युसन रस्ता) - खंडोजीबाब चौक, कर्वे रस्ता, सेनापती बापट रस्ता, रेंजहिल्स

  • गाडगीळ पुतळा ते स.गो.बर्वे पुतळा (छत्रपती शिवाजी महाराज रस्ता) - गाडगीळ पुतळा, कुंभार वेस, आरटीओ चौक, जहॉंगीर रुग्णालय मार्गे पुढे

  • वीर चाफेकर चौक ते वाकडेवाडी भुयारी मार्ग - रेंजहिल्स किंवा औंधमार्गे पुढे

  • डेक्कन वाहतुक विभाग ते थोपटे पथ (मॉडर्न महाविद्यालय रस्ता) - घोले रस्ता व आपटे रस्ता

कृषी महाविद्यालय चौक ते लक्ष्मी रस्ता (भवानी पेठ/नाना पेठ)

  • फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता - शास्त्री रस्ता, म्हात्रे पुल, नळ स्टॉप, सेनापती बापट रस्ता

  • लाल बहादूर शास्त्री रस्ता - म्हात्रे पुल, गरवारे महाविद्यालय, नळस्टॉप मार्गे पुढे

  • टिळक रस्ता - विश्‍व हॉटेल, ना.सी.फडके चौक, म्हात्रे पुल, नळस्टॉप

  • छत्रपती शिवाजी महाराज रस्ता - फुटका बुरुज, गाडगीळ पुतळा, नदीपात्रातील रस्ता

  • लक्ष्मी रस्ता - राष्ट्रभुषण चौक हिराबाग, म्हात्रे पुल, नळस्टॉप व बेलबाग चौक, रामेश्‍वर चौक, शनिपार चौक, बाजीराव रस्ता, रास्ता पेठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT