Ashadi Wari 2023 Form of Wari Changed But Spirit Remains Dr G B Deglaurkar pandharpur culture india maharashtra sakal
पुणे

Ashadi Wari 2023 : वारीचे स्वरूप बदलले, पण आत्मा कायम - डॉ. गो. बं. देगलूरकर

डॉ. गो. बं. देगलूरकर ः ‘वारी’वरील इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यात सुमारे आठशे वर्षांपूर्वी वारीची परंपरा सुरू झाली. वारी, दिंडी आणि पालखी या शब्दांमध्ये फरक आहे. यावरून वारीचे स्वरूप बदलत गेले. पण आजही वारीचा आत्मा तोच कायम आहे. वारकरी संप्रदायाचे आयाम लक्षात घेतले तर, वारीने एक समृद्ध परंपरा निर्माण केली असल्याचे मत मूर्तीशास्त्राचे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी शनिवारी (ता. १०) येथे बोलताना व्यक्त केले.

विठ्ठल हा देव वारीच्या केंद्रस्थानी असून, विठ्ठलाशिवाय वारी पूर्ण होऊच शकत नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुंबई येथील नॅशनल लॉ स्कूलमधील प्रा. डॉ. वरदा संभूस-पाठक यांनी वारी या विषयावर इंग्रजी भाषेत लिहिलेल्या `वारी पिल्ग्रीमेज भक्ती, बिईँग ॲँड बियॉँड’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. देगलूरकर आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते झाले.

त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे, संत तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज शिवाजी मोरे, लेखिका डॉ. संभूस, इंडस स्क्रोल प्रेस या पब्लिकेशनचे श्रीदत्तन आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. देगलूरकर पुढे म्हणाले, ‘‘वारीची परंपरा सुरु होण्यामागे एक इतिहास आहे. समाजातील सर्व घटकांना एकत्र करण्याची त्या काळची गरज होती. संत हे समाजाला मार्गदर्शन करून त्याद्वारे समाजात जनजागृती करत असतात.

त्यामुळे त्यावेळच्या संतांनी आपापले भिन्नभिन्न असलेले संप्रदाय बाजूला ठेवले आणि वारीसाठी हे सर्व संत एकत्र आले. यासाठी त्यांनी आपला सर्वांचा एकच देव आणि तो म्हणजे विठ्ठल हे तत्त्व मान्य केले.वारीत जेवढी शिस्त असते. तेवढी शिस्त लोकसभेतसुद्धा दिसत नाही. ’’

या पुस्तकात वारीविषयी सखोल माहिती दिली आहे. वारीला केव्हाच वैश्‍विक मानचिन्ह प्राप्त व्हायला हवे होते. पण ते झाले नाही. या पुस्तकात वारीविषयी सखोल माहिती दिली आहे. हे पुस्तक म्हणजे एक सांस्कृतिक ठेवा आहे. हा ठेवा २जी-२० मध्येही मार्गदर्शक ठरेल, असे मत डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

यामध्ये वारीच्या भवितव्याविषयी लिहिलेले दिसत नाही. वारीच्या भवितव्याबाबतची माहिती भविष्यात या पुस्तकात द्यावी, असेही त्यांनी यावेळी सुचविले. श्रीदत्तन यांनी प्रास्ताविक केले. लेखिका डॉ. वरदा संभूस, डॉ. अरुणा ढेरे, शिवाजी मोरे यांनीही मनोगत व्यक्त केले. देवदत्त भिंगारकर यांनी सूत्रसंचालन केले. अमृता संभूस यांनी आभार मानले.

आता हरितवारी व्हावी - शिवाजी मोरे

जगतगुरू संत तुकाराम महाराज आणि श्रीसंत ज्ञानेश्‍वर महाराज या दोन्ही पालख्यांसमवेत निर्मलवारी आयोजित केली जाते. त्याच धर्तीवर आता हरितवारी व्हायला हवी. यासाठी पालखी मार्गांवर झाडे लावावीत. जेणेकरून ही हरितवारी होऊ शकेल, असे मत संत तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज शिवाजी मोरे यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT