bank of maharashtra sakal
पुणे

बँक ऑफ महाराष्ट्रच्या कार्यकारी संचालकपदी आशिष पांडे

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये रुजू होण्यापूर्वी ते युनियन बँक ऑफ इंडियामध्ये मुख्य सरव्यवस्थापक आणि मुख्य परिचालन अधिकारी होते

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक म्हणून आशिष पांडे यांनी शुक्रवारी (ता. ३१) सूत्रे हाती घेतली. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये रुजू होण्यापूर्वी ते युनियन बँक ऑफ इंडियामध्ये मुख्य सरव्यवस्थापक आणि मुख्य परिचालन अधिकारी होते.पांडे यांची बँकिंग क्षेत्रातील २४ वर्षांची व्यावसायिक कारकीर्द असून, कर्ज व्यवहार, कोशागार व व्यापारी बँकिंग, विदेशी चलन विनिमय व्यवहार, विपणन व ग्राहक संबंध आणि बॅकिंग परिचालन असे विविध विभाग त्यांनी सांभाळले आहेत.(Bank of Maharashtra)

पांडे हे यांत्रिक अभियांत्रिकीत पदवीधर असून, त्यांनी वित्त व विपणन विषयामधील व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी प्रावीण्यासह प्राप्त केली आहे. ते भारतीय बँकर्स संस्थेचे प्रमाणित सहयोगी असून, विमा, म्युचुयल फंड व डिमॅट परिचालन यामध्ये राष्ट्रीय शेअर बाजाराचे प्रमाणन प्राप्त केले आहे. त्यांनी बंगळूरमधील भारतीय व्यवस्थापन संस्थेचा कार्यकारी नेतृत्व विषयक अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. कॉर्पोरेशन बँकेच्या मुंबईमधील औद्योगिक वित्त शाखेतून पांडे यांनी आपली कारकीर्द सुरू केली.

त्यांनी गुंतवणूक व आंतरराष्ट्रीय बँकिंग विभागातही काम केले आहे. युनियन बँकेत विलीन करण्यात आलेल्या दोन बँकांचे विविध प्रक्रियांचे स्वयंचालन व डिजिटायझेशन यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. व्हाट्सअप बँकिंग, नामनिर्देशन, मृत्यू दाव्यांचा ऑनलाइन निपटारा, ग्राहकांच्या दारात बँकिंग सेवा असे विविध नावीन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या चमूचे ते प्रमुख होते. युनियन बँक ऑफ इंडियाच्या जयपूर विभागाचे प्रमुख उपसरव्यवस्थापक म्हणून पांडे यांनी राजस्थानात बँकेचे नेतृत्व करून सर्वांगीण सुधारणा घडवून आणली. ते बँकिंग महासंघाच्या संचालक मंडळावर नामनिर्देशित संचालक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

Food Adulteration Crackdown: अन्न भेसळ पथकाच्या धास्तीने टाकळी राजेरायमध्ये सर्व दुकाने बंद; गुटखा व भेसळयुक्त सुट्या तेलाच्या खुलेआम विक्रीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT